४२.कुटुंब

आबा…. !!!!! सगळेच जोरदार ओरडले .. आणि धावले.. कारण.. जिना  उतरून येताना त्यांचा तोल  होता.. आणि शेवटच्या ४-५ पायऱ्या ते .. घसरत खाली आले .. डोक्याला मार लागलेला….  हात पायातले त्राण गेलेलं… आबा बघून सगळयांचा आ वसला.. 

आबा… !!! धावतच सगळया बायका पुढे आल्या.. कसेबसे त्यांना हात देऊन… उठवले.. अवजड शरीर .. कोणालाच धड पेलवेना.. 

श्रेया धाव.. रिक्षा बोलावं… ह्यांना डॉक्टरकडे नेले पाहिजे…. डोक्याला मार लागलेला.. बेशुद्ध अवस्था..वैनी… महादू काकांना बोलवा लवकर .. मीराने भरभर निर्णय घेतले.. बेबीताई तुम्ही माईकडे बघा… शैलाताई तूम्ही चला.. आमच्याबरोबर… कदाचित मदत लागेल.. 

मी फोन करते ह्यांना.. न सुचून संगीत वैनी बोलल्या.. आता कस होणार.. ? या आधी कधीच त्यांच्यावर असा प्रसंग एकटीने आला नव्हता.  कुठेही जायचं म्हटलं की सुरेश दादा असायचं हॉस्पिटल बाहेरची काम खरेदी सगळे तेच करायचे …. 

वैनी … त्यांना येईल र्यंत वेळ लागेल ना.. त्यांना आपण सरळ हॉस्पिटलला बोलावूं घेऊ त्यापेक्षा.. 

मामी.. .रिक्षा आली.. श्रेया धावतच आली तसे महादू काका, मीरा आणि शिलाताईंच्या मदतीने मीरा आबांना नेहमीच्या डॉक्टरकडे (डॉक्टर जोशी)  घेऊन आली… 

डॉक्टर काका.. आबा बरे आहेत ना…? शैला ताईंनी काळजीने विचारलं… 

ह्हम्म तसे ठीक आहेत.. डोक्याला मार लागला आहे.. त्यात कमरेवर पडले आहेत.. आपण थोड्या टेस्ट करून  घेऊ.. त्यात त्यांचे बीपी हाय झाले आहे .. मला वाटतं की त्यांना ऍडमिट करून घेऊ 1- 2 दिवस,  तोपर्यंत सगळे रिपोर्ट येतीलच मग बघू काय करायचे आहे ते …. म्हणत त्यांनी निरोप घेतला.. 

तुमच्याकडे.. काही सोय… मीराने चाचरत विचारले.. खरेतर त्यांच्या छोटासा दवाखाना होता.. हॉस्पिटल वैगरेची सोय नव्हती.. फॅमिली डॉक्टर म्हणून जोशी डॉक्टर होतेच.. छोट्या-मोठ्या सर्दी-खोकला-ताप मुलांची दुखणे यासाठी जोशी डॉक्टरच … 

नाही ग.. तुम्हाला हॉस्पिटल बघावे लागेल.. सिटी हॉस्पिटलमध्ये बघ.. कदाचित बेड असेल.. मी फोन करून ठेवतो त्यांना.. पण लगेच जा.. 

आता .. काय करायचं? … वाहिनीने धास्तावलेल्या आवाजात विचारले.. 

मी बघते .. हॉस्पिटलमध्ये बेड आहे का , नाहीतर दुसरे काहीतरी  बघावे लागेल.. तुम्ही थांबा.. मी आलेच.. ह्यांना पण फोन करून  बघते.. म्हणत मीरा भरभर बाहेर पडली.. जवळच्या सिटी हॉस्पिटलला तिला एक बेड मिळाला.. तसे ती लगोलग परत आली .. आणि आबा वैनी ना घेऊन परत सिटी हॉस्पिटलला आली.. 

५०००/- भरावे लागतील…   सिटी हॉस्पिटलच्या रिसेप्शन काऊंटरवर दोघी उभ्या होत्या.  डिपॉझिट लागेल त्याच्यानंतर हा फॉर्म भरून द्यावा लागेल … तोपर्यंत आम्ही पेशंटला ॲडमिट करू शकत नाही … तस शैलाताई आणि वैनी एकमेकाडे बघू लागल्या… 

एवढे पैसे दोघीकडे ही नव्हते.. दोघी अजीजी करू लागल्या होत्या पण कोणी दाद देईना.. तिकडे बाहेर आबा आणि मीरा वाट बघत बसून होते.. 

आबा .. ५ मिनिटात आले.. का वेळ लागतोय म्हणत नाही.. आलेच हा.. जाऊ नका हा कुठे .. शेजारच्या मुलाला लक्ष ठेवायला सांगून मीरा रिसेप्शन ला आली.. तर वैनी आणि ताई दोघी संचित मुद्रा करून वाद घालत होत्या.. 

काय झाले ताई…? का वेळ लागतोय? मीराने विचारले.. काहीच कळेना.. 

अगं सध्या ट्रीटमेंट सुरू करा डिपॉझिट भरू असे म्हणतो तर ऐकत नाहीये आता आपण काय पैसे न देता जाणारे आहोत का पण ह्यांना पटतच नाही … 

ताई हॉस्पिटलमध्ये आधी पैसे भरून मगच ॲडमिशन मिळते त्या शिवाय कोणीही घेणार नाही तसले नियमच आहेत … त्यांच्या नोकरीवर गदा येईल नाहीतर … किती भरायचे आहेत माझ्याकडे आहे थोडे तिने आपली पर्स चाचपत म्हटले .. कालच्या  इव्हेंटचे पैसे मिळाले होते.. ते मंडपवाल्याला दद्यायचे होते, डेकॉरटीशांचे पेमेंट बाकी होते. 

५००० मागतात.. लुटारू कुठले.. वैनी त्राग्याने म्हटले.. अजून सुरेशदादाचा पत्ता नव्हता.. अशा वेळी प्रतापराव आणि मनोहर पंत हि बिझी  होतात.. प्रकाशचे तर बोलायला नको.. त्याच्याकडे एवढा पैसे नसणारच .. त्यात आता तर नोकरी पण नाही.. नवीन धंदा.. म्हणजे ठणठण गोपाळ.. ह्याची खात्री… 

मी .. मी देते.. आहेत माझ्याकडे.. नंतरचे नंतर बघू.. म्हणत मीराने पैसे काढले.. तसे वैनी आणि शैलाताई एकमेकडे बघू लागल्या.. हिच्या हातात एवढे पैसे .. आले कुठून,…? आपापल्या पर्सेस मध्ये तर उलटी  केली तरी  १००० भर रुपये निघणार नाहीत.. अन हि बया एवढे घेऊन फिरते.. !!!

ते .. इव्हेंटचे डेपोईस्टचे पैसे होते.. द्यद्यचे हात सध्या ह्यात बघवते ..मग बघू.. सध्या आबा ना ऍडमिट केले पाहिजे .. हे निघालेत.. येतील थोड्या वेळात पोचतील.. म्हणत मीरा ने फॉर्म ओढला.. पैसे  नीट मोजून हातात दिले आणि फॉर्म भरायला घेतला.. थोड्यावेळात आबा ना ऍडमिट केले तसे मीरा बाहेर पडली.. घरी कळवायला हवे.. पुढची सोया बघायची होती.. 

आबा ना ऍडमिट केले आहे.. मीराने आपल्या घरी कळवले आणि मग माईंना फोन केला.. त्या तिथे कासावीस झालेल्या.. अजून कोणाचा पत्ता नव्हता कि फोन नव्हता कि निरोप नव्हता. .. नक्की काय झाले आहे.. काहीच कळायला मार्ग नव्हता.. ( मोबाइल ह्या जमान्यात  सर्रास नव्हता अगदी तुरळक लोकांकडे असायचा.. ) 

घरचा फोन खण खण झाला तसे बेबीताईने लगबगीने फोन उचलला..  त्यांना थोडक्यात कल्पना देऊन माईंना संभाळायला सांगितले.  आता सुरेश दादा आणि प्रकाश थोड्याच वेळात हॉस्पिटलला पोहोचतील एवढे सांगून तिने फोन ठेवला आणि पाटणकरांना निरोप ठेवला आज संध्याकाळी साखर पूडाचे इव्हेंट होते.. पाटणकर आज संगीत मैफिलच कार्यक्रम बघत होते.. प्रकाश चॅनलच्या कामात गुंतलेला…  आता आयत्या वेळी कोण कुठे कसे..  मॅनेज करायचे हे मीराला कळून येत नव्हते … प्रचंड टेन्शन आलेलं.. आता सगळेच दोष देणार.. सुरेशदादा आणि प्रकाश नक्की विचारणार ..  काय झाले..? कसे झाले.. अन सगळे बाहेर पडणार.. इथे तमाशा नाही केला भावा- बहिणीने म्हणजे मिळवले.. उलट सुलट विचार करून ती परत हॉस्पिटल मध्ये आली… सगळेच तेनशें मध्ये बसलेलं.. आबांच्या वेगवेगळ्या टेस्ट सुरु होत्या.. एक्स रे काढण्यात आला.. 

तेवढ्यात प्रकाश तिथे पोचला . मागोमाग सुरेशदादा ही .. दोघं ही आबांना असे बघून घाबरले.. काय झाले कसे झाले चौकशी सुरु झाली तसे मीरा बाहेर येऊन बसली.. सगळं दोष तिच्या माथी मारला जाणार हे  माहित होते.. आशा फक्त प्रकाशकडून.  त्याने साथ दिली तरच.. पण आबा आपल्यामुळे पडले आणि हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले..हे प्रकाश पचवू शकेल का.. ? वडील आणि बायको.. है यामध्ये प्रकाश कोणाची बाजू घेईल.. मीरा विचारात पडली.. आपोआप तिच्या डोळ्यात पाणी तरळलं .. 

मीरा.. इथे का बसली आहेस ग.. सगळे कुठे आहेत.. ?? मीनाताईने मिराच्या डोक्यावर हात फिरवत म्हटले. . बरी आहेस .. ना तू..?

आई… मीरा मुसमुसतच आईच्या कुशीत शिरली.. तसे आईने तिच्या पाठीवरून हात फिरवला.. शांत बघू.. मीरा.. काय झालं.. बाळा… ?/ सांग मला.. 

मीरा ने मुसमुसत काळ घडलेला प्रकारा नि आजची सकाळच बोलणे आईला हळू आवाजात सांगितले.. तसे आईने तिला चुचकारले.. शांत हो.. हहम्म्म.. असं नाही रडू.. आहे ना आम्ही .. काही नाही होणार.. शांत हो बघू.. आई तिला बराच वेळ समजावत राहिली.. इथे सुरेशदादा मात्र तावातावानं बाहेर पडले.. सोबतच संगीत वैनी ही मागोमाग त्यांच्या मागे मागे धावल्या.. तसे शैलाताई एक रागाने मीरा आणि तिच्या आईकडे कटाक्ष टाकत मागे-मागे निघाल्या .. 

तू थांब तिथेच…  मी बघते काय झाले ? ते मी बोलल्याशिवाय आत येऊ नकोस कळलं.. ? मीनाताईने परिस्थितीचा रागरंग बघून म्हणाल्या.. अन त्या आत शिरल्या.. आता शांताने पडले होते.. बाजूच्या स्टुलावर प्रकाश डोकं धरून बसला होता.. बरेचसे टेन्शन..दिसत होते. .चेहरा पडला होता. बहुतेक आबा ना पहिल्यन्दाच असं हॉस्पिटलमध्ये बघत होता….. 

प्रकाश राव… आईनी हळूच हाक मारली. 

आई .. तुम्ही.. !! इथे.. 

हो.. मगाशी.. मीराने फोन केला होता….. कसे आहेत आबा आता…???

ठीक आहेत …तसे…डॉक्टर एकदा बघून गेलेत…रिपोर्टची वाट बघत आहेत….बी पी हाय आहे…बघू आत काय होते ते…..तो विषांनपणे म्हणाला….

थोडावेळ कोणीच बोललं नाही ..मीनाताई ना वाटत होते की प्रकाशराव काहीतरी विषय काढतील…पण प्रकाश आपल्याच विचारात होता….म्हणून मीना ताई ही गप्प बसल्या…

थोड्याच वेळात, मीरा ही आत शिरली…कोणीच काही बोलत नव्हते…माई, बेबीताई दोघी ही आबा बघायला म्हणून आल्या…मीना ताई ना बघून ..बेबीताई चपापली…

दुपार नंतर सगळेच हॉस्पिटल ला आले…गर्दी झाली होती हणून बाहेर थांबून राहिले होते…इथे मीरा आणि प्रकाश मात्र संचित होते..कार्यक्रम होते..सगळी सोय जातीने बघायचे ते…आता कसे करणार…ह्याची विवंचना होती…

प्रकाश राव…तुम्ही निघा आम्ही  आहोत ना ….मीरा तिन्ही जा..आज प्रोग्राम आहे ना …शेवटी मीना ताईने न राहून म्हटले…तसे सगळे एकमेकाकडे बघायला लागले…

आई अग….मीरा चाचरत म्हटले…

सगळे थांबून ..काहीच होणार नाही…आब ठीक आहेत ना…उलट सगळ्यांनी नंबर लावला तर कोणालाच त्रास होणार नाही..एक दोन दिवसाची गोष्ट आहे…नाही का…अस मला वाटत…भावनिक न होता…प्रॅक्टिकल निर्णय घेऊ या चालेल…मीना ताईने समजावणीच्या सुरात म्हटले तसे सगळ्यांनी मान डोलावली….

मी थांबते…आबा बरोबर… बाकीच्यानी घरी जा..सकाळपासून दगदग झाली असेल …माई ना..नाही झेपत आता या वयात..… संध्याकाळी कोणीतरी या…डब्बा घेऊन…परत रात्रीला कोण थांबेल….ते बघा…

मी थांबेन …प्रकाशने लगेच पुढाकार घेतला…साधारण

१० पर्यंत येईन मी…चालेल…??? तसे दादानी मान डोलावली…

चालेल…मी थांबेन तोपर्यंत….

सगळ्यांचा पटलेले दिसले तसे लोक निघाली…मीराला सगळे नीट समजावून धीर देऊन आई ने तिला पाठवले… कार्यक्राम नीट उरक गा…इथली काळजी करू नकोस ..काही लागला तर मी बाबा ना फोन करेन….समजले…आहे ना मी …काही टेन्शन घेऊ नकोस….

बघितले ना …कशी आहे ते..आईला बोलावून घेतले लगेच…म्हणजे काही बोलायची सोयच नाही राहिली….बेबीताई आपल्या शैलाताई जवळ मन मोकळे करत म्हटले…आपल्याला नाही सुचत नाही असेल काही…

मी तर केव्हाच पाणी जोखले शेबतीचे …दिसते तेवढी साधी भोळी तर मुळीच नाही हा ..मीरा…!!! महा कावेबाज  बाई आहे…संगीता वैनी ने साथ दिली….आता प्रकाश आणि घरचे बोलणार म्हटल्यावर आई बाबा दोघांना घेऊन हजर…!!! म्हणजे सासरचे कसे छळतात बघा दाखवायला मोकळे….

नाही तर काय…!!! शैला ताईंनी री ओढली….

चला आता ….मालकीण बाई काही स्वयंपाक करायला येणार नाहीत …गेल्या त्या…इव्हेंट करायला…आपल्याला डब्बा द्यावं लागेल…आता किती दिवस काय माहीत…तणतणत वैनी पुढे निघाल्या….डोक्यात राग होताच….

एकतर मीरा ने भरभर निर्णय घेतले..सगळेच हुशारी आणि धडाधडीचे निर्णय भरभर घेऊन मोकळी झाली…..लगेच एवढे पैसे ही भरले…आपण मात्र मोठी सून म्हणून काहीच करू शकलो नाही….नुसते तोंड बघत बसलो…. आता अजूनच  मीरा मीरा उदोउदो सुरू…खरंच सगळेच जमते ह्या पोरीला…आपल्याला काहीच येत नाही…बोलून घालवतो..ह्या विचारानेच त्यांची चिडचिड होत होती…राग काढायला काहीतरी कारण सापडत नव्ह्ते….

रात्री सगळ्यांची चर्चा झालीच..नक्की काय झाले ते सगळ्यांना कळलं होते..तसे प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले…शैला ताई ने आकणाडतांडव करायला नको होते..सुरेश दादाने म्हणतच  शैलाताई परत भडकल्या ….तुम्हाला मीच दिसतेय…नेहमी माझीच चूक…नाही का…??? बरोबर आहे…म्हणा … आता आबाच कोण करणार.. ?? हॉस्पीटलचे बिल  ?? सगळेच बघणार ना ..मीरा आणि प्रकाश …मग त्यांचीच बाजू घे तू दादा…बरोबर ना…

शैला…!!! तोंड सांभाळून बोल….एवढे जर वाटत ना …मग तू भर… नाहीतर तूच तमाशा केला… म्हणुन ..हे सगळे झाले…पहिल्यापासून सवय आहे तुला स्वतःची चूक दुसऱ्यावर खपवायची….

वाह रे वा….!!! मी का म्हणून भरायचं ??? आहात कि तुम्ही दोघं.. पुढे पुढे करायला.. दोन दोन वंशाचे दिवे… …ते कशासाठी आहेत मग….! एरवी तर मी परकी असते नाही का 

.. सासुरवाशीण .. आहे ना मी.. 

मग दोन पणत्या पण आहेत की.. त्या का फक्त प्रॉपर्टीवर वेटोळे घालण्यासाठी आहेत….??? नुसते फायदा बघा…कर्तव्य नकोत  ह्या दोघी ना…. बघितले ना…बैनी fanakaryane म्हटले तसे गोष्टी हमरीतुमरीवर आल्या….

एक मिनिट एक मिनिट.. काय चालवले आहे हे.. ?? प्रसंग काय.. भांडण कसले करताय… ? मनोहर पंत शेवटी ना राहून मध्ये पडले… मुलींचा हक्क वैग्री ठीक आहे कायदा आहे पण कर्तव्याच्या गोष्टीसाठी कुठेच कायदा नाही.. हे त्यांना पक्के माहित होते.. जुन्या गोष्टी उकरून काढल्या तर आजची रात्र ही पुरी पडायची नाही.. त्यात आबा आधीच घर जावई या प्रकरण फारसे पटलेलं नव्हते.. अधून मधून कुरबुरी व्हायच्या.. आता मूळ मुद्दा बाजूलाच.. आता मध्ये नाही पडले तर बेबी काहीतरी बोलून आपल्याला गोत्यात आणेल.. ह्याची त्यांना पक्की खात्री होती.. तसे हि सासऱ्याविषयी फार प्रेम असे नव्हते पण अगदीच व्यवहार करून चालणार नव्हते.. हे तितकेच खरं … 

हे बघा.. आम्ही कर्तव्यात कुठे हि कमी पडलो नाही.. आणि पडणार नाही.. माई आबा ना आम्ही व्यवस्थित बघू .. त्यासाठी गरज नाही … तुमची पण मग हक्क सांगताना हे हि लक्षात असू द्या .. एवढेच.. सुरेशदादाने म्हटले.. घरचे बाहेरच बघतो ना सगळे आहि कमी पडले का सांग.. पण दर वेळी असं नाही चालणार शैला .. सांगून ठेवतो.. नाही तर … 

नाहीतर .. काय करशील? बाहेर काढशील .. हा ? शैला आणि बेबी ताई  तावातावाने बोलल्या .. कायदा आम्हाला  पण माहित आहे.. आणि कुठली हक्काने बाहेर काढशील.. हा.. तुझे तरी आहे का .. अजून आबाच आहे हे घर.. इथून फक्त आबाच काढू शकतात .. हे लक्षात ठेव.. आला मोठा… !!! 

एवढा कायदा माहित आहे त हि नाही माहित का की मुलींचे लग्न झाल्यावर सासरी राहायचं असते..  तू कशाला येते ठिय्या मांडून बसली आहेस मग  … जा न  आपले कर्तव्य कर सासरी जाऊन …

तू फक्त मला घरा बाहेर काढायला संधी शोध .. बायकोच्या ताटाखालचे मांजर कुठला.. एवढा त्रास होत असेल ना तर सांग आबांना वाटणी करा…  घ्या आपापले हिस्से आणि व्हा वेगळे सगळ्यांनी .. म्हणजे तुमची तोंडही बघायला नको आम्हाला… एवढेच या गोष्टीने आता वेगळेच वळण घेतले बोलून-चालून सगळे हिचा प्रॉपर्टी पैसा कर्तव्य यावरून सगळ्यांची चांगलीच जुंपली.. 

एक मिनिट ताई.. काय चालवले आहे हे.. ज्यांनी केले .. ते मस्त आपले उद्योग सांभाळत आहेत.. आणि आपण इकडे भांडत बसलो आहोत.. दादा ना एवढेच म्हणायचे आहे कि.. तुम्ही असं करायला नको होते.. त्यात तुमची पण बदनामी झालीच कि… शाळेत का लोक ओळखत नसतील श्रेयाला.. चर्चा होणारच.. जहागीरदारच नाक कापला जाईल.. ते वेगळे.. त्यात आता आबाच दुखणे वाढले म्हणजे.. ?? सगळेच प्रॉब्लेम.. नाही का ?? मनोहर पंत शेवटी आपला वकिली बाणा बाहेर काढला.. आणि हिस्सा करणे , रिडेव्हलपमेंट करणे वाटते तेवढे सोप्पे नाही.. आबा नि सही केल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही.. त्यामुळे इथे वाद घालण्यात काहीच पॉईंट नाही.. उलट आपल्यात दुही होतेय आणि त्याचा फायदा दुसर्यांना होईल.. बाकी तुमची मर्जी .. मी काय बोलू.. म्हणत ते उठले तसे बेबीताई हि त्यांच्याबरोबर बाहेर पडली.. तसे सगळेच विचारात पडले.. 

इकडे प्रकाश, रात्री साठी म्हणून हॉस्पिटल ला येऊन बसला होता. सुधाकरराव हि फेरी मारून नुतकेच घरी गेले होते.. मीरा चा आजचा कार्यक्रम आटपत घेतला आणि हॉस्पिटल ला आली..५ मिनिट आबा कसे आहेत बघून ती घरी जाणार होती.. .सकाळपासून प्रकाश एक शब्द तिच्याशी बोलला नव्हता ह्याचे वाईट वाटत होते…कुठेतरी मनात अपराधी भाव होताच स्वतःचे प्रकाशही आपल्याला येत आहे असे तिला वाटत होते आपली बाजू नीट मांडून निर्णय ती त्याच्यावर सोडणार होती.. 

अहो….. 

प्रकाश नुकतेच डोळे मिटून बेडवर डोके ठेवले होते रात्री झोपायला विषयी निवड अशी जागाच नव्हती जनरल वॉर्डमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते बाबांची तब्येत तशी ठीक वाटत होती.  रिपोर्ट आले नव्हते तरीही काही फ्रॅक्चर वगैरे नव्हते  हीच काय ती जमेची बाजू नुकत्याच गोळ्या घेऊन त्यांना बहुतेक झोप लागली होती .. थोडीबहुत चौकशी करून प्रकाश आणि मीरा बाहेर पडले.. 

 तुम्ही झोपा एखादं ब्लँकेट मिळते का बघा म्हणजे फरशीवर अंथरायला करायला बरे पडेल … .. 

मीरा.. त्याने अलगत तिचा खांदा दाबत म्हटले…  थँक्यू … 

माईने  सांगितले मला तू भरभर निर्णय घेतले आणि आबांना हॉस्पिटल ही ऍडमिट केले.. शाब्बास..  सॉरी मीरा माझ्यामुळे तुला बरच काही आता ऐकावे लागणार आहे मी काहीच नाही करू शकत या लोकांच्या विरोधात, सॉरी.. ग ..  पण आता मात्र मी निर्णय घेऊन मोकळा होणार आहे …बस थोडा वेळ हवा आहे.. 

अहो.. तसे प्रकाशने तिच्या ओठांवर बोट ठेवले सांगेन तुला…  आता मात्र मीराला त्याची भीती वाटू लागली होती एवढा दृढनिश्चय चेहरा तिने आजवर बघितला नव्हता प्रकाश नक्की काय निर्णय घेणार आहे या विवंचनेत ती पडली … 

क्रमशः 

One thought on “४२.कुटुंब

Leave a comment