#32 Ek Choti Si Love Story Season 2

प्रीती ला समोर बघून आश्चर्याचा धक्का बसला….आपसूकच तोंडातून निघाले…काकी !!!! आई !!! तुम्ही इथे ??? आणि काही क्षणात भानावर येत ती त्यांच्याकडे झेपावली….

त्या दोघी हि पटकन तिच्याकडे झेपावत तिला मिठीत घेतले….

मला खरंच वाटत नाही गा…तुम्ही इथे आहात ते….!!! आपले अश्रू कसेबसे थोपवत तिने म्हटले

इथे आई आणि काकी ने तिला घट्ट जवळ घेतले होते..आई तर जवळ जवळ वर्षाने लेकीला बघत होती त्यामुळे जास्तीचा भावूक झाली होती…

कशी आहेस गा माझी सोनी ते…..म्हणत तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली….अश्रू ने केव्हाच बांध सोडला होता…

सगळे प्रेम इथेच करणार आहात आपल्या लाडक्या लेकी चे की आत पण येणार आहात सगळे ..शेवटी निनाद ने म्हंटले….तसे सगळेच हसले….

आता शिरताच दोन्ही मुलं …आजी आजोबाना घट्ट बिलगली…काय करू आणि काय नको असे झाले होते दोघांना….कितीतरी वेळ दोघा आजीआजोबा ना काय काय दाखवत होते…

इथे निनाद आणि प्रीती ने सगळ्यांचे सामान आत आणले…एका बेडरूम मध्ये निनाद चा आई बाबांचे तर मुलांच्या रूम मध्ये प्रितीच्या आईबाबा चे सामान ठेवले….प्रीती ने आवेगाने निनाद ला जवळ ओढले…थँक्यू…..आवडले मला तुझे गिफ्ट…थँक्यू निनु….

अच्छा ..आत्ता थँक्यू म्हण ..आणि गेले दोन दिवस जी चिडचिड चालावेली त्याचे काय…!!!

मला वाटले तू विसरलास …प्रीती ने तोंड पाडून म्हटले….

शाहणी आहेस खूप..हेच ओळख ले ना तू मला…त्याने ढकलत म्हटले….जा …. थकलेत सगळेच..नाश्ता दे आणि झोप काढा ..मी जातो ऑफिसला …नंतर बोलू आपण….ओके!!!

प्रीती हिरमुसली ..पण निनादचे कान पकडत तिने परत सॉरी म्हटले आणि खाली पळाली…तसे निनाद हसला…हॅपी बर्थडे .. प्रिन्सेस…..त्याने ओरडून म्हटले तसे सगळेच प्रीतीला हसले…

निनाद लवकरच ऑफिसला निघून गेला…आणि प्रीती आपल्या घरच्यांच्या सेवेला लागली…सगळ्यांना आपले घर फिरवून दाखवले मुलांनी, आपले सामान, शाळेच्या बॅगा, पुस्तक दाखवत सगळ्यांनी गरम गरम नाश्ता केला आणि हळू हळू पेंगायला लागले….प्रीति मात्र संध्याकाळच्या तयारी लागली..आपल्या आणि निनाद चा आई वडील ना इथे खूप फिरवायचे आराम द्यायचा हे तिने मनोमन ठरवले होते..त्या प्रमाणे ती तयारी लागली…

रात्री उशिराच निनाद घरी आला..तर दोन्ही आई बाबा जागेच होते..छान तयार होऊन सकाळ असल्यासारखे निनादची वाट बघत होते…तो येताच ..प्रीतीला औक्षनची तयारी केली होती…थोड्याच वेळात तयार होऊन निनाद खाली आला…

प्रीती ने आज छान गर्द हिरवी शिफॉन साडी आणि त्यावर मॅचींग दागिने घालून केस मोकळे सोडले होते…. निनाद ला आवडतात तसे..😍😍😍😍

वाह …मस्तच ..निनाद ने नजरेनेच दाद दिली..तसे प्रीती लाजली….आधी प्रीती आई ने तिला ओवाळले आणि तिला ड्रेस गिफ्ट म्हणून दिला…मग काकी ने तिला ओवाळले आणि सोन्याचा दागिना दिला…तसे प्रीतीने नाही म्हटले….

अगा मला ठेवून काय करायचे आहेत ते आता…सगळे तुझेच आहे..ह्या वर्षी चे सगळे सण मिळून हे तुला गिफ्ट आहे आज…नाही म्हणू नकोस…माझा सासूबाईंनी मला दिला होता एकदा..आज तुला देत आहे….तू तुझ्या सुनेला दे…तसे प्रीती ने दागिना घेतला…

प्रीती उठायला गेली तसे निनाद ने तिला थांबवले…

किड्स कम..गिफ्ट आणा मम्मा चे
…म्हणत निती आणि प्रीतम ने आपले गिफ्ट आणले…एक छान बर्थ डे कार्ड आणि एक मोठी फोटो फ्रेम ज्यात त्यांचे वर्षभराचे फोटो कॉलाज करून लावले होते….ते बघून प्रीती ने त्यांना पटकन जवळ घेत पापी दिली….निनाद ने तो मोमेंट मस्त कॅप्चर केला…

अच्छा ..म्हणजे हे दोघं पण तुझ्या पार्टी मध्ये होते तर…!!! प्रीती ने आश्चर्याने विचारलें…

आपली एकाच पार्टी आहे आहे वेडू….म्हणत निनाद ने हसत प्रीतम नितीला टाळी दिली…..

चला चला आता जेवायला….. खोटे खोटे रागवत म्हटले.तसे निती ओरडली…

मम्मा ..केक तर राहिला ना… कट करायचा !!!!!

अरे हो.. आणला आहे हा..गाडीत ठेवला आहे…म्हणत निनाद ने पटकन जाऊन केक आणला….छान मोठा पांढरा बॉक्स त्यावर मोठा रेड बो लावला होता….इथे प्रीती ने टेबल सजवले होते…मुलं नुसती गोंधळ घालत होती….केकचा बॉक्स बघून अजूनच मस्ती सुरू झाली….

प्रीती बॉक्स उघडायला गेली तर बो जवळ एक चिठ्ठी होती..तिने ते हळूच काढून घेतली आणि वाचायला घेतली….

येणारा प्रत्येक दिवस,
माझ्या प्रिन्सेस चा असावा,
जीवनात कधी तुझ्या
दुःखाचा एक क्षण नसावा,
मनात जे जे असेल तुझ्या
ते ते तुला मिळावे
प्रयत्नाना तुझ्या नेहमी
उदंड यश मिळावे
हसत खेळत पूर्ण होवो
तुझ्या सगळ्या इच्छा…
म्हणूनच ह्या इंद्रधनू चा
तुला खास शुभेच्छा…,🤩🤩🤩🤩🤩

अरे वा..मस्तच आहे हा निन्या…सॉरी निनाद..तिने हसत म्हटले…

तसे निनाद ने हसला…चल आता केक काप….हे बघ दोघा कसे छळ करतात माझा ते……आवरत नाहीत माझ्याच्याने हे दोघा…..

छान हार्ट शेप चा मस्त इंद्रधनुष्य असलेला केक होता. प्रीती ने कँडल ना बाजूला काढत ..पूर्ण गोंधळात केक कापला…तसे निती आणि प्रीतम ने केकचा ताबा घेतला…

केक खाऊन सगळेच जरा वेळ गप्पा मारत बसले मग प्रीती ने सगळ्यांना जेवायला बसवले…छान सगळ्यांच्या आवडीचा गरम गरम स्वयंपाकावर सगळ्यांनीच ताव मारला…..पण निती ने जेवता जेवता तरी ही प्रश्न विचारलाच…डॅडी सगळ्यांनी गिफ्ट दिले मम्मा ला …तू काहीच नाही दिले ना…मम्मा…….तसें प्रीती ने तिला दटावले….

शाहणी…आजी आजोबा आले ना इथे तेच माझे गिफ्ट आहे हा..द बेस्ट गिफ्ट आहे डॅडी कडून माझ्यासाठी…

…प्रीती सावरून धरले तर निनाद चा मात्र चेहरा पडला..सॉरी त्याने कान पकडत म्हंटले….प्रीती ने त्याला हळूच पुरी वाढत म्हटले…नको तिचे मनावर घेऊ रे…लहान आहे ती अजून….

सगळ्यांना आग्रहाने जेवायला घालत..मगच प्रीती जेवायला बसली….निनाद ने तिला श्रीखंड पुरीचा घास भरवला.मग सगळ्यांनीच एक एक करत तिला भरवले….तसे प्रीती चे पोट तुडुंब भरले….बस बस करत शेवटी ती उठीलीच…..वाढदिवस खूपच दणक्यात साजरा झाला होता……रात्री प्रीती झोपायला आली तेव्हा निनाद ने छान अंधार करून मस्त कँडेल लावून ठेवल्या होत्या..मंद संगीत सुरू होते….

डान्स करशील??? प्रीती येताच त्याने विचारले..

प्रीती ने आपला हात पुढे केला..आणि दोघा एकमेकांच्या मिठीत शिरून मंद संगितावर ताल धरला…प्रीती ने आपले डोके निनाद चा छातीवर टेकवले. निनाद …थँक्यू…खरंच मस्त गिफ्ट होते रे….कित्ती आठवण येत होती माहीत आहे घरची…तू पण नसतो आजकाल बोलायला… खूप एकट वाटत होते मला…

माहित आहे.म्हणून तुझ्या माझ्या सासूसासऱ्याना घेऊन आलो आहे…त्यांना सांभाळणं, फिरवणे तुझे काम …तुझ्यावर फुलं जबाबदारी….पहिल्यांदा परदेशी आलेत..एकदम लक्षात राहील अशी ट्रीप करायची…जमेल ना????

येस बॉस…बघ तू…प्रीती ने त्याला सल्यूट करत म्हटले..तसे निनाद ने तिला अजून घट्ट धरत म्हटले….ब्युटिफुल…छान दिसते की तू साडीत…सेक्सी एकदम…!!!! पण काही तरी कमी आहे …..हम्म काय बरं ..म्हणत त्याने एक डायमंड रिंग प्रितीच्या बोटात सरकवली…..

निन्या..काय हे….कित्ती सुंदर आहे !!!! प्रीती आपल्या अंगठी कडे बघत म्हटले…गिफ्ट आवडले होते हे नक्कीच…

हम्म्म…पण ह्या चा पेक्षा कमीचहा.. निनाद ने तिच्या उघड्या कमरेवरून अलगद हात फिरवत म्हटले….

झाला ..तुझा चावटपणा सुरू…..!!!! म्हणत प्रीती ते आपले ओठ त्याचा ओठावर टेकवले…..

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

इथे मंदार मात्र एकटाच प्रीतीचा फोटो जवळ बसून प्रेस्त्री आणि मेणबत्ती लावून बसलेला..मनातल्या मनात स्वतःशी गप्पा मारत होता…नक्की काय होते आहे आपल्याला ???का ओढ लागते तिची हल्ली…आपल्या जवळच राहते आहे म्हणून?? इतके कधी गुंतलो तिच्यात मी?? का मन ओढ घेते अजून तिच्याकडे इतकी वर्षांनी ही , का आस लावून आहे अजून मन..कित्तींदां तरी समजावले स्वतला, ती सुखी आहे आपल्या संसारात आता ..कुठेच जागा नाही मला…तरी का सारखे तिला बघावेसे, बोलावेसे वाटते…कदाचित सगळे मिळवून तिला मिळवता आले नाही म्हणून ?? ती आपली होऊ शकत नाही म्हणून त्वेषाने पेटून उठले आहे का मन ?…काहीच कळेना…पण बस तिला त्रास होईल असे वागायचे नाही हे नक्की पण आपले ही मन काबू मंध्ये ठेवायला शिकायचे…लांबून ती सुखात आहे हे बघून आपले सुख मानायचे…..हेच तर हवे होते ना तुला प्रीती…!!! जा खर प्रेम खरायला शिक म्हणालीस…कोण शिकवेल मला हे सगळे प्रीती..एक तूच होतीस जे चांगले वाईट पटवून द्यायची…..आता ते सांगायला ही कोणीच उरले नाही…..म्हणत त्याने सुस्कारा सोडला……

प्रीतीचा फोटोला विश केले आणि केक खाऊन त्याने शांतपणे व्हिसकीची बॉटल तोंडाला लावली….आज ही तो प्रीतीचा घरासमोर थांबून राहिलेला, तिची एक झलक बघायला पण बराच वेळ थांबल्यावर ही प्रीती दृष्टीस पडली नव्हती, निनादला त्याने गाडीतून केक घरात नेताना बघितले होते…घरात आज खूप चहेलपेहेल वाटत होती……कदाचित पाहुणे आले असतील…पार्टी असेल घरी…

बराच वेळ वाट बघून ही कोणीच नाही यायच नाव घेईना….म्हणून मग कंटाळून शेवटी तो घरी निघून आला होता आणि एकटाच घरी प्रीती चा वढदिवस साजरा करत होता…

#35 Bucket List

तन्वी हसतच आपल्या रूम मध्ये आली… अनिकेत ला बघून कसे मन हलके हलके झाले होते…पिसासारखे…

खरंच प्रेमाची कबुली काय दिली आणि इथे सातव्या आसमनवर पोचलो आपण….तिला हसताना, आपल्याच दुनियेत मस्त बघून..निशा ने भानावर आणले…

मॅडम…आपण हॉस्पिटल मधे आहोत ह्याचे भान ठेवा जरा…मावशी येईल आता…जरा चांगले अक्टिंग कर..नाहीतर पचका करशील…आणि हो अनिकेत बदल इतक्यात काहीच बोलायचे नाही….ओके ..त्याच्याशी बोलूनच मग पुढं च काय ते ठरवायच चालेल ना…

हम्म्म..खरच की… चल मला झोपाव आता बेड वर….म्हणत तन्वी ने हात पुढे केला….

थोड्याच वेळात, लगबगीने आई-बाबा येताना दिसले तसे ती सावरून बसली…

आई बाबा ने येताच मायेने चौकशी केली..थोडे जुजबी बोलून बाबा डॉक्टरांना भेटायला गेले..तसे आई ने विचारले….बॉस बरोबर बाहेर भटकायला जाताना काहीच वाटत नाही का तुला…लग्नाचे वय आहे तुझे…लोक काय म्हणतील??? ह्याचा तरी विचार करायचा ना??

मी ऑफिसमधील कामासाठीच चालेले होते आई…प्लीज समजून घे ना..माझ्या बॉस ला ही खूप लागले आहे…फक्त मलाच नाही काही….तिने दुखी आवाजात म्हटले….

तेवढ्यात निशा ही मध्ये बोलली….काय गा मावशी तू अशी?? एक तर तिला कित्ती लागले आहे ते

विचारायचे सोडून तुझे आपले दुसरेच सुरू…आता काय मुली ऑफिसचा कामानिमित्त फिरत नाही का? एकाच ठिकाणी जायचे असेल तर ती वेगळ्या कार ने आणि बॉस वेगळ्या कार ने जाणार का???

काय गा तू पण…म्हणत निशा गळ्यात पडली….!!! आई वरमली आणि गप्पा बसली…पण निशा खूपच आगावू झाली आहे हे कानावर घातले पाहिजे बहिणीच्या हे ही मनात आले..

थोड्यावेळात बाबा परत आले आणि तन्वीला काही टेस्ट साठी नेण्यात आले…आई आणि निशा हॉस्पिटल ला थांबलेल्या तर बाबा घरी गेले फ्रेश व्हायला …तन्वी ला गोळ्या घेऊन झोप लागली आहे हे बघून निशा तिथून सटकली आणि अनिकेत कडे जाऊन आली…

अनिकेत ची आई एकटीच एकटक अनिकेत कडे बघत आसव गाळत बसली होती…हे बघून निशा पटकन एक कॉफीचा मग घेऊन आली……

आंटी कॉफी??? तिने अलगद खांद्यावर हात ठेवत म्हटले…

मग स्वतःची ओळख करून दिली…अनिकेतची आई एक साधी सोज्वळ बाई वाटली..अगदी सुधा मूर्ति च ..तशीच कॉटोनची साडी चापून चोपून नेसलेली, गळयात एक साधे एकसर, कानात कुड्या आणि हातात एक सोन्याची बांगडी….घट्ट बांधलेले अंबाडा आणि चेहरा काळजीने काळवंडलेला…अगदी कोणाची ही प्रेमळ आई शोभेल अशीच…कोणी म्हणेल हिला असे बघून ही बाई कोट्याधीश आहे म्हणून..निशा चा मनात आले…

आपलीच मावस बहीण अनिकेत बरोबर गाडीत होती…म्हटल्यावर तिने लगेच काळजी ने तन्वी चा तब्येतीची चौकशी करायला सुरुवात केली…..अनिकेत ला जाग ह े बघून निशा गहिवरले… एकीकडे मावशी साधी चौकशी पण नाही केली आणि एकिकडे अनिकेतची आई….कित्ती जमीन अस्मानाचा फरक आहे दोघी मध्ये…. निशाचा मनात आले…

अनिकेतच्या आईशी थोड्यावेळ बोलून निशा तिथून निघाली…तन्वी जवळ येऊन बसली… दुपारनंतर तन्वी चे रिपोर्ट्स आले..सगळे ठीक होते पण डोके अजून गरगरत होते म्हणून तन्वीला दुसऱ्या दिवशी सोडणार होते….अनिकेत ही तसा बरा होता पण त्याला अजून बरेच दिवस हॉस्पिटल ला राहावे लागणार होते बहुतेक…

रात्री साठी तन्वी चे बाबा थांबले..थोड्यावेळ तन्वी ची गप्पा मारून ते पुढे काय बोलावे हे विचार करू लागले..तेव्हा तन्वी ने विषय काढला…आपले प्रमोशन,ऑफिस चा नवीन जबाबदारी, त्यात कुकिंग शो, यूट्यूब स्टार होणे , मुलाखत,आता हॉटेल साठी चे कन्सल्टिंग सूरू करण्याचा विचार ऐकून बाबा अचंबित झाले….बाप रे ..एवढे सगळे कधी पासून कसे सुरू झाले वैगरे वैगरे विचारून घेतले…बोलून बोलून तन्वी दमली शेवटी नर्स ने दटावले तसे गोळ्या घेऊन झोपली….मनात मनातल्या मनात अनिकेत शी संवाद झाला होताच…निशा असतो तरी सा गितले तरी असते एकदा बघुन येऊ म्हणून….आता तर ती पण संधी नाही…उदास होत शेवटी तन्वी ने डोळे मिटले…

दुसऱ्या दिवशी, निशा लवकरच हॉस्पिटल लनाली…येताना तन्वी साठी गरम गरम नाश्ता घेऊन आली….तन्वी चा वडिलांना घरी पाठवले..मावशी येई पर्यंत थांबते असे म्हणून कसे बसे पाठवले…..

आधी तन्वी ला खायला प्यायला घटके आणि मग काल अनिकेत चा आई ला भेटली असल्याचे सांगितले…छान आहे हा सासू तुझी…आवडली मला..निशा ने हसत म्हटले तसे तन्वी लाजली….गप्प गा..काहीही बोलते…वेडी !!!!

चल भेटवते तुला..जरा छान आटपून घे मग जाऊ या आपण…म्हणत तिचे केश विंचरून दिले..थोडे फ्रेश होऊन हळूहळू आधार घेत , चालत ती अनिकेत चा रूम मध्ये आली…

रूम मध्ये अनिकेत ही उठून बसलेला आणि सोबत त्याचे आई बाबा ही होते…..त्यांना बघून तन्वी घाबरली..पण अनिकेत ने तिला नजरेनेच आश्र्वसत केले ..घाबरु नकोस…डोळ्यानेच विनवले…

तन्वी ने स्वतःची ओळख करून दिली आणि अनिकेत चे चौकशी केली….अनिकेत चा आई बाबा ने ही तिची काळजीने चौकशी केली…थोड्यावेळ बसून , गप्पा मारून अनिकेतला धीर देऊन…. नंतर भेटू असे म्हणत ती हळु हळु निघाली…

त्या संध्याकाळी तन्वी ला हॉस्पिटल मधून सोडण्यात आले..जाता जाता निशा आणि तन्वी, अनिकेत ला भेटून आल्या….सोबतच त्याचा आई बाबा ना ही भेटून काळजी घ्या म्हणून सांगितले आणि वाकून नमस्कार केला..अनिकेत ला हलकेच हातावर थोपटत तिथून निघून गेली…अनिकेत मात्र तिच्याकडे नजरेपासून दूर जाई पर्यंत बघत राहिला…

तन्वीचे आई बाबा दोन दिवस राहून निघून गेले..तो पर्यंत तन्वी ला काही हॉस्पिटलला जाता येईना..पण निशा मात्र कॉलेजला जायचे निमित करून त्याला भेटायची, आजीकडून लाडीगोडी लावत अनिकेत साठी सूप आणि हलका नाष्टा घेऊन जात होती…आणि सोबत निरोप ही…आपले कबुतर बनण्याचे काम इमान इतबारे करत होती….सोबत अर्थात विरेन होताच.

दोन दिवसांनी आई बाबा घरी निघाले तसे तन्वी ने सुटकेचा निःश्वास सोडला..चला सुटले रे बाबा….!!! …दुसऱ्या दिवशी सकाळीच तयार होऊन, सगळी तयारी घेऊन, सोबत एक दोन पुस्तक घेऊन ती हॉस्पिटल मध्ये आली…..

अनिकेत ची आई फक्त हॉस्पिटलमध्ये होती..त्यांना जाऊन भेटली. साधीशी तनु, फार मनमोकळी नाही पण दिसायला सुंदर, कामसू आणि दुसऱ्यांचे मन जाणणारी तनु आई ला आवडली..तन्वी ने ऑफिस चा विषय काढत गप्पा मारत मारत अनिकेत ला सूप दिले…एरवी सूप प्यायला आढेवेढे घेणारा अनिकेत आज चक्क सूप पित आहे हे बघून आई काय ते समजून गेली आणि हसली…

तन्वी ने जाताना अनिकेत चा आई चा हातात २पुस्तक ठेवली…आंटी ..तुम्ही इथे बसून बोर व्हाल ना..म्हणून आणली आहेत…माहीत नाही तुम्हाला आवडतील की नाही ते…पण चांगले विषय आहेत ..माझ्या कलेक्शन मधले आहेत…तुम्हाला आवडले तर बघा.. म्हणत तिने दोन पुस्तक हातात दिली….तिच्या पुस्तकांची चॉइस बघून आई ला नवल वाटले….मुलगी समजदार वाटत आहे…मनात आले.

आजी, निशा आणि मामा एकदोनदा हॉस्पिटल ला येऊन अनिकेत बदल चौकशी करून गेले होते.

आठवड्याने अनिकेतला घरी सोडण्यात आले.आता महिनाभर आराम होता.हाताचे आणि पायाचे प्लास्टर काढे पर्यंत अनिकेत ऑफिस ला येणार नव्हता…ऑफिस चे काम थोडेबहुत सगळेच सांभाळत होते. अनिकेत आणि आई ही घरी आले होते. त्याचे बाबा फोन वरून रोज चौकशी करत होते. सोबत नर्स होतीच अनिकेत ला सांभाळायला…तन्वी आणि निशा ने सुचवले घरून काम करण्याबदल….थोडे थोडे सुरू करता येईल, अनिकेत ला ही ते पटले…तन्वी आणि ऑफिस ची अजून एक मुलगी असे मिळून रोज अर्धा दिवस अनिकेतकडे जाउन काम करणार होते. आई आणि नर्स सोबतीला होतेच…..

हळूहळू काम सुरू झाले तसे अनिकेत ची आई घरात बसून कंटाळून गेली शेवटीं तन्वी त्याने घेऊन जवळ ची ठिकाणे फिरवून आणायला लागली…आई आणि तन्वी ची आता चांगलीच दोस्ती झाली होती…सोबत अनिकेत बरोबर आँखो आँखो में प्यार की बाते सुरू होतेच…आनिकेत ची आई मात्र हे सगळे बघून न बघितलेल्या सारखे करत होती….

अशातच एक दिवस, आईला बंगलोरला जावे लागणार होते…कोर्ट मध्ये त्या लढत असलेल्या केस ची तारीख होती…..आपले नाव वापरून कशीबशी त्याने गरीब बाई ला न्याय मिळावा म्हणून केस उभी केली होती.त्यासाठी जाणे भाग होते..

आपल्या सोशल वर्क आणि मुलगा ह्या मध्ये त्या अडकल्या होत्या…अनिकेत ने कसेबसे समजावले, नर्स होतीच सांभाळायला, बाकी तन्वी निशा विरेन होतेच ,ऑफिसचा स्टाफ होताच अनिकेतवर लक्ष ठेवायला…दिवसभर ऑफिसचा स्टाफ असायचा.. कामात वेळ निघून जात होता…रात्री विरेन ने राहायची तयारी दाखवली..बाकी मित्रमंडळी येऊन जाऊन होतीच..असे समजावत अनिकेत ने आईला निर्धास्त केले आणि बंगलोर ला पाठवले….त्या रात्री विरेन, अनिकेत कडेच राहिला…दोघांनी मिळून खूप गप्पा मारल्या, आपल्या आयुष्यची स्वप्नं रंगवली….जर सगळे ठीक राहिले तर दोघा एकमेकांचे साडू बनणार होते…ह्या गोष्टी वर दोघांनी मनमुराद हसून घेतले……एक नवीन मैत्रीची सुरुवात होत होती…

दुसऱ्या दिवशी सकाळीच, निशा आणि तन्वी अनिकेत कडे पोचले….बराच वेळ बेल मारून ही..दर उघडले नाही तसे निशा ने वैतागून विरेन ला फोन केला…तसे झोपलेल्या आवाजात त्याने फोन उचलला…तसे निशा ने त्याला चांगलेच झापले आणि दार उघडायला लावले….

मंद ..काहीच कळत नाही ना तुला…निशा ने रागवत म्हटले..तसे विरेन ला कळेना आपले नक्की काय चुकले ते…

फक्त हिंमतीने लढ

ज्याने रचना केली त्याला 1,00,000 वेळा सलाम करतो….

घरटे उडते वादळात
बिळावारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी, कोणतं पाखरू 🐜🕊
म्हणून का आत्महत्या करते ?

प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनुदान मागत नाही 🐅

घरकूलासाठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो का तिला गृहकर्ज ?🎭

हात नाहीत सुगरणीला
फक्त चोच घेऊन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज ती मागते ?🕴

कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेऊन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?

घरधन्याच्या संरक्षणाला
धाऊन येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ?
असं विचारत नाही मित्रा
🐕
राबराब राबून बैल
कमाऊन धन देतात
सांगा बरं कोणाकडून
ते निवृत्ती वेतन घेतात ?🐂

कष्टकऱ्याची जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपासारखं
पाषाणावरही टिकलं पाहिजे🤕

कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन् कोकिळा गाते मंजुळ गीत🐧

🐝मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही

घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जीव एवढा स्वस्त नाही
सावकाराला जाऊन ठणकावूण सांग😎

काळ्याआईचा लेक कधी
संकटांपुढे झुकला का ?
कितीही तापला जरी सुर्य
समुद्र कधी सुकला का ?🌊💦

निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तू फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय🎑

निर्धाराने जिंकू आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई
तू फक्त हिंमतीने लढ👊

फक्त हिंमतीने लढ👊

🌺🌷!! आवडली तर इतरांनाही शेअर करा !!🌹🌹

# 34 Bucket List

#34 बकेट लिस्ट..

पाणी . कण्हत हलके आपली जीभ ओठावर फिरवत तन्वी ने हाक मारली…आपण कुठे आहोत हेच तिला कळेना…

एका हाताने कोणी तरी अलगद चमच्याने पाणी देत होते…अमृतासमान वाटत होते ते…सगळे अंग ठणकत होते..डोक्यावर काहीतरी जड जड ठेवल्यासारखे वाटत होते आणि सगळेच धसुर दिसत होते….सगळीकडे पांढरी शुभ्र चादर पसरलेली आहे असे वाटत होते….हलका निःश्वास सोडून तिने आपले डोळे t केला….किती सोप्पी क्रिया..पण आज त्याला ही जणू खूप वेळ आणि शक्ती खर्च होत होती…

काही तरी अावाज झाला…कोणीतरी जवळ उभा राहून बोलत आहे असे वाटले..आवाज ओळखीचा वाटत आहे…मग कुठून येत आहे..सगळे धसुर का दिसत आहे..तिने उठण्याचा प्रयत्न केला..तसे तिला सावरण्याचा हात दिले कोणीतरी…

बरे आहेस आहे..?? डोके दुखत असेल नाही तुझे ??? कोणीतरी विचारात होते…

हम्म…खूप दुखत आहे…मी कुठे आहे ?? इथे कशी आली…..तिला काहीच कळेना…काय चाललंय ते..असे का होते आहे काहीच कळेना…

Accident झाला होता तुझा …गाडीत बेशुद्ध अवस्थेत सापडलीस तू…आजूबाजूच्या लोकांनी आणले तुला हॉस्पिटलमध्ये… बेशुद्ध होतीस गेले ५ तास…थोडी नीट शुद्ध येऊन दे..मग सगळे ठीक होईल…तुझ्या घरचे आले आहेत बाहेर इथे…थांब बोलावते हा….म्हणत ती नर्स बाहेर गेली…तन्वी ने तसेच आपले डोके खाली टेकवले…….

दोन तीन मिनिटातच आजी आणि तन्वी आता आल्या..आजी तर देव धावा करतच आत येत होती..निशाला मात्र तिला बघून हायसे वाटले….

तनु बरी आहेस ना?? कसं गा असे झाले?? तुला कुठे लागले आहे का?? आजी आणि निशा भरभर बोलत होते आणि तन्वी ला काहीच आठवत नव्हते…

आजी मला काहीच आठवत नाही आहे…मी इथे कशी आली ते…खूप डोके दुखत आहे ….

घाबरु नकोस तनु..होते असे कधी कधी…अगा डोक्याला मार लागला आहे..तुझा एक हात मुरगळला आहे..त्याला बांधून ठेवले आहे…मुका मार लागला आहे तुला..म्हणून अंग दुखत आहे तुझे…धक्यामुळे कदाचित तुझे डोके आपटले आणि तू बेशुद्ध झाली होती ..सगळे ठीक आहे ..काळजी नको करू….

हम्म्मम..अनिकेत कुठे आहे .. तो कसा आहे??..

हे ऐकताच निशा आणि आजी ला धसस झाले..अनिकेत चा जबरदस्त अपघात झाला होता. खूप लागले होते त्याला…

इथेच..बाजूच्या रुमध्ये… तनु त्याचा मोबाईल पूर्णपणे क्रॅश झाला आहे…त्याच्या घरच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नाही…बरा आहे तो पण..

तेवढ्यात डॉक्टर आत आले..तन्वी ला तपासले…थोड्या टेस्ट सांगितल्या…काळजी करू नका …सगळे ठीक आहे..धक्क्या मुळे किवा घाबरल्यामुळे कदाचित बेशुद्ध झाली असावी..पण आपण एकदा टेस्ट करून घेऊ…खात्री होईल..असे म्हणत डॉक्टर निघून गेले…

आजी ला थकल्यासारखे वाटत होते म्हणून निशा तिला बाहेर बसवून आली…मामा मामी तन्वी ला भेटायला गेले….तिथेच कळलं घरी बंगलोरला सांगितले तन्वी चा अपघात बदल..आई बाबा लगेच निघाले होते..उद्या सकाळपर्यंत पोचणार होते….

थोड्याच वेळात मामा मामी आणी अाजी निघाले..तन्वी जवळ निशा थांबणार होती..मामा रात्री परत येणार होता हॉस्पिटल मध्ये राहायला….तन्वी ची थोडावेळ बोलून सगळेच निघाले…

तन्वी ही बऱ्यापैकी फ्रेश झाली होती..अंग दुखत होते..खास करून डोके ..पण बाकी सगळे व्यवस्थित वाटत होते…निशाला तिकडे बघून तिला हायसे वाटले…

कित्ती घाबरलो आम्ही तन्वी, फोन आला तेव्हा..नशीब तुझ्या फोन मध्ये माझा एमर्जन्सी नंबर टाकला आहे…मी आणि विरेन आलो धावत…विरेन चे बॅचे मेट आहेत इथे लगेच ट्रीटमेंट मिळाली तुला आणि अनिकेत ला…..तन्वी मात्र कासूनसे हसली…

निशाला मला अनिकेत ला बघायचे आहे?? घेऊन चल ना…प्लीज..

नको तन्वी..तो खूप क्रिटिकल अवस्थेत आहे…तुला नाही बघवणार…डॉक्टर म्हणतात २४ तासात जर त्याला शुद्ध नाही आली तर तो कोमा मध्ये जाईल…

त्याचे ऑपरेशन करावे लागले आहे तन्वी…आणि घरच्यांशी काहीच कॉन्टॅक्ट होत नाही आहे ….तुला काही कल्पना असेल तर सांग…

हे ऐकताच तन्वी अजूनच घाबरली..क्रिटिकल आहे..आपल्याचमुळे झाले हे सगळे….आपणच पनवती आहोत ह्या सगळ्यांच्या आयुष्यात..आज अनिकेत चा जीव माझ्यामुळे धोक्यात आहे….ती भीती ने थरथर कापू लागली…निशाला तिला असे थरथरता ना बघून ..अजूनच घाबरली..कसेबसे तिला शांत केलं…

तन्वी तुला घेऊन जाते मी……प्लीज पण काही गडबड करू नकोस…..तुला सगळे सांभाळायचे आहे आता…लक्षात येते ना….

तन्वी साठी व्हीलचेअर घेऊन येऊंन निशा तिला अनिकेतला बघायला घेऊन गेली होती….

शरीरात असंख्य नळ्या घातलेला हा अनिकेत आहे हे सांगावे लागत होते..ठिकठिकाणी बंडेज लावले होते…त्याला बघून तन्वी रडायलाच लागली…

सॉरी अनिकेत…माझ्यामुळेच झाले हे सगळे..प्लीज उठ ना..म्हणत ती रडायला लागली….तन्वी त्याला बराच वेळा हाका मारत राहिली आणि मुक रुंदन करत राहिली,पण अनिकेत हलला नाही…शेवटी ना राहून निशा तिला तिथून घेऊन गेली…

रात्री मामा, तन्वीचा सोबतीला राहिला..दुसऱ्या दिवशी पहाटेच निशा हॉस्पिटलला आली…तिला कुठे तन्वी शिवाय चैन पडत होते..

तन्वी रात्रभर जागीच होती..झोप कुठे येणार होती अनिकेतला असे बघून..रात्रभर डोळ्याला डोळा लागला नव्हता..कसला तरी विचार करत पहाट झाली होती….

निशाला तिला परत अनिकेत जवळ घेऊन आली..हलकेच तिच्या खांद्यावर आपले हात दाबत म्हणाली..तन्वी वेळ कमी आहे आणि बहुतेक तुझ्या हातात आहे सगळे आता…थोड्याच वेळात मावशी (तन्वी चे आई बाबा) पोचतील, अनिकेतची आई ही दुपारपर्यंत येत आहे आणि वडील बहुतेक उद्या पहाटे…सांभाळ त्याला..

निशा तिला एकटीला सोडून बाहेर गेली…आत रूम मध्ये तन्वी चा श्वास आणि मॉनिटर ची बीप ऐकू येत होती…तिने अलगद त्याचा सलाईन लेबल हसत आपल्या हातात घेतला आणि हाक मारली…अनिकेत ..उठ ना… केव्हाची वाट बघते आहे ..आणि तू मस्त झोपून राहिला आहेस….अनिकेत ..उठ ना..किती वेळ झोपला आहेस… उठतोस ना??

तिने अलगद त्याचा हात दाबत म्हटले…उठा ना अनिकेत ..खूप बोलायचे आहे तुझ्याशी…तू खरच बोललास ..मैत्री पेक्षा जास्ती काय आपल्यामध्ये काहीतरी …फक्त मला कबुल करायचं नव्हते एवढेच….पण आत्ता नाही अनिकेत ..
.कबुल आहे अनिकेत माझे तुझ्यावर प्रेम आहे..नाही असे बघू शकत तुला….एक क्षणभर विसरले नाही तुलाह्या एवढ्या वर्षात …अनिकेत माहीत होते एक ना एकदिवस आपण भेटणार…तू नाही मला फसवणार…तू ही खर प्रेम केलस माझ्यावर..टाईमपास नाही केलास..हे दाखावू या सगळ्यांना…उठ ना अनिकेत .प्लीज असे नको ना करू …

मला गरज आहे तुझी..कोण मला सांभाळणार सांग बघू..कोण मला धीर देणार..कोण माझा कॉफाईडन्स वाढवणार..कोण मला सारखे प्रोत्साहित करणार…नवनवीन गोष्टी शिकवणार…सांग ना अनिकेत…तुझ्याशिवाय मी अधुरी आहे रे…उठ ना अनिकेत हळूच ने स्वतःला कसेबसे बेड चा कडे ला जोर देऊन उठवले…

निशा हे सगळे दरवाज्यात उभे राहून बघत होती…पुढे जाणार तेवढ्यात ..तिचा हात विरेन ने खेचला..No…Don’t Disturb Them…

कमाल आहे विरेन..तुझा ह्या सगळ्यांवर विश्वास आहे…नक्की डॉक्टर आहेस ना तू…..

तुला शंका आहे ..तर राहून दे…आम्ही फक्त प्रयत्न करतो …बाकी सगळे देवाच्या हातात आहे…आणि जे मी बघतोय ना …ही लवस्टोरी आता पूर्ण होणार आहे बघ…म्हणत त्याने मॉनिटर कडे बोट दाखवले….

Check pulse rate…….

तशी निशा हसली
..विरेन ने तिला अलगद आपल्या जवळ ओढले….आपली पण लव स्टोरी हिट आहे हा…

इथे तन्वी ने आपले तोंड त्याच्या कानाजवळ नेले आणि हळूच म्हटले…निक …उठ मा.. अन्वी वाट बघते आहे..कित्ती तरी वर्ष…I love you Nick..Getup Nick…you can’t give up…you can’t give up on me … Nick..you have to get up
.for me for us…not at this time Aniket…

तू नाही ना उठलास अनिकेत तर मी परत मोडून जाईन रे..परत जुनी तन्वी बघायची आहे का? सांग बघू.ह्यासाठी आलेलास का इथे सगळे सोडून??? सांग ना…सगळे मला बोलतील अनिकेत , माझ्यामुळेच झाले हे सगळे..हे ऐकायचं का मी जन्मभर सांग बघू म्हणत तन्वी चा डोळ्यातून अश्रू पडायला लागले…

इथे मॉनिटर ची बिप बिप वाढत होती…तसे विरेन ने निशा ला बाजूला केले आणि अनिकेत चा जवळ पोचला…निशा ..डॉक्टरला लवकर बोलावं…तन्वी दी..तुम्ही बाजूला व्हा..हे इज गिविंग रिस्पॉन्स …

निशा ने धावत जाऊन डॉक्टर ला आणलें..तन्वी बाजूला होऊन मनातल्यामांनात अनिकेत ला साद घालत होती…विरेन ने तन्वी आणि निशाला बाजूला घेऊन बाहेर काढले…He is going to be Ok now…trust me
..विरेन ने तन्वी ला आपल्या रूम मध्ये झोपवले.. सगळे ठीक आहे आता..तू काळजी नको करू..दी…तो आता एकदम बरा होणार आहे…आणि हो काँग्रल्यातूनस …वेलकम तो लवर्स क्लब !!!!!! म्हणत विरेन आणि निशा ने तिला जवळ घेतले…तसे तन्वी ने दोघांना धपाटा घातला……

#31 Ek Choti Si Love Story Season 2

प्रीती विचार करतच झोपी गेली…दुसऱ्या दिवसा पासून चांगलेच निनाद कडे लक्ष द्यायला सुरुवात केली…चांगला सकस नाश्ता सोबतच लंच ही द्यायला सुरुवात केली…आधी आधी निनाद ने खूप आढेवेढे ह्यायला सुरुवात केली पण प्रीती समोर निनाद चे काही चालेना…वेळेवर फोन करून लंच ची आठवण, ज्यूस सगळे त्याचा सेक्रेटरी कडून घेऊ लागली…आपल्या बायको ची कित्ती वट आहे हे आता निनाद ला कळून चुकले …बोलण्यात काहीच अर्थ नव्हता…आलिया भोगासी….दुसरे काय….

प्रीती चा डब्बा देण्यामुळे असो की बारीक लक्ष ठेवण्याचे असो…त्याचा फायदा निनाद ला झाला….एक तर तब्येत सुधारली आणि ऑफिस ची एक एक लोक डब्बा शेअर करत ऑफिस मध्ये मैत्रीपूर्ण सुरुवात झाली…

होता होता न्यू इअर आले…कित्ती पटकन वर्ष गेले हे..न्यू इअर लां सगळेच टाईम स्क्वेअरला आले होते.. अचाट गर्दी, लाऊड मुसिक , भरपूर प्रकाश, वेगवेगळ्या प्रकाश योजना, देश विदेशाचा पदार्थचा रेलचेल आणि न्यू इअरचा जल्लोष…..निनाद ने न्यू इअर ला टाईम स्क्वेअर ला जायचा प्लान केलेला …इथल्या न्यू इअर बदल खूप काही ऐकले होते ..आज प्रत्यक्ष अनुभव घेणार होते….

सगळेच हरखून बघत होते. एक नवीन अनुभव होता सगळ्यांचाच…निती आणि प्रीतम मॅजिकशो बघण्यात मश्गूल होते…सोबत निनाद आणि प्रीती हे मस्त बालपण एन्जॉय करत होते..वेगवेगळ्या जादू करून जादूगार सगळ्यांना रिझवात होते….

भरपूर चालत, सगळीकडे ची मज्जा बघत सोबत थंडीत ही गरम गरम बॉइल्ड कॉर्न आणि चिकन स्टिकचा आस्वाद घेत गम्मत बघत होते आणि हळू हळू काऊंट डाऊन सुरू झाले…

१०..९..८..चा जल्लोष सुरू झाला….आणि सगळीकडे फायर वर्क सुरू झाले..लोकांच्या उत्सुकता शिगेला पोचली आणि जलोषातच हॅपी न्यू इअर म्हणत नवीन वर्षाचे स्वागत केले..निनाद ने निती ला कडेवर घेतले होते तर प्रीती ने प्रीतम ला…गर्दी प्रचंड होती…निनाद ने सगळ्यांनाच जवळ ओढत म्हटले..हॅपी न्यू इअर..किडीस…तसे प्रीती पण हसली….मी पण किड्स झाली काय आता…!!!

गप..तुला न्यू यॉर्क स्टाईल ने हॅपी न्यू इअर करतो..थांब..म्हणत त्याने समोर इशारा केला….समोर एक कपल मस्त लीप लोक मध्ये गुंतले होते…तसे प्रीती ने डोळे मोठे करूनच नकार दिला….चल हट!!! नंतर हा…म्हणत प्रीती ने अलगद त्याला दूर केले….

चौघाही चालत चालत लांब पर्यंत निघाले….सगळी कडे मज्जा मस्ती सुरू होती…एके ठिकाणी गरम गरम pretzels मिळतं होते..थंडी तर मी म्हणत होती..काहीतरी गरम गरम खावेसे वाटत होते…निनाद घेऊया ना….प्लीज..खूप थंडी आहे…

ओके..थांब आणतो…म्हणत त्याने नितीचा हात सोडला…बघ हिला…त्याने ओरडून सांगितले आणि गर्दीत शिरला…इथे प्रीती रस्त्याचा कडेला दोघांना घेऊन उभी राहिली…माहीत नाही कुठून पण अचानक एक गर्दीचा मोठा लोट आला आणि नीतीचा हात सुटला…काहीच क्षणच गेले..गर्दी निघून गेली…पण निती कुठेच दिसेना..प्रीती जाम घाबरली…अरे आताच तर इथे होती…..

गेली कुठे !!!

नीती…नित्ती…दोघा हाक मारू लागले…इथे प्रीतम ही तिचा हात घट्ट धरून निती ला जोरात जोरात हाका मारत शोधू लागले…एवढ्या गर्दीत ती कुठेच दिसेना..निनाद ने मागे सहज मागे वळून बघितले…तर प्रीती रस्त्यावर सैरवैरा पळत हाका मारताना दिसली..नक्कीच काहीतरी गडबड आहे….तो धावत लाईन सोडून बाहेर आला…

काय झाले ..??? प्रित्स…त्याने घाबरून विचारले…

नीती…सापडत नाही आहे …माहीत नाही कसा हात सुटला रे…

आता मात्र निनादची सटकली…निती हरवली म्हणजे काय !!!!.

लक्ष देता येत नाहीत तुला….एवढेसे पण जमत नाही का तुला!!!! ….त्याने त्यांनी रागातच म्हटले…

प्रीती स्तब्ध झाले मग भानावर येऊन म्हणाली तू त्या साईडला बघ मी ह्या साइडला बघते…. पोलिसांची मदत घेऊया..म्हणत दोघा ही वळले…

भान हरपून , तिथल्याच आजूबाजूच्या लोकांना निती चा फोटो दाखवत ..दोघा ही शोधत होतें..तेवढ्यात प्रीतीला फोन आला कोणाचा तरी….आधी कळेलच नाही .फोन वाजतो आहे ते..बाहेर गोंगाट होता खूप…पण शेवट चा रिंग ला प्रीती ने फोन आनसर केला…समोरून कोणतरी इंग्लिश मध्ये बोलत होते… नीट स कळले नाही पण फोन लगेच निती च्या हातात दिला मम्मा अशी तिने हाक मारताच..प्रीती च्या डोळ्यातून आसव निघाली….नीतीला कसेबसे शांत केले आणि कुठे आहे ते विचारले……

नीती ने जवळच्या दुकानाचे नाव सांगितल आणि लवकर ये ना मम्मा ..म्हणतं परत रडायला सुरुवात केली..प्रीतीने पटकन फोन ठेवला..निनादला फोन लावला..

निती सापडली !!!! तिने जोरात ओरडून सांगितले… दुकानाचे लोकेशन दिले….जवळ जवळ फोन आपटत तिने गुगल सर्च मध्ये दुकानाचा नाव टाकले… पुढच्याच ब्लॉक मधले दुकान होते ते…प्रीती प्रीतम चा हात घट्ट धरून धावतच ती पर्यंत पोहोचली एका गोऱ्या पोलिस जवळ निती आपले हात घासत उभी होती….तिला पाहताच जीव जीव आला…

नीती….!!!!! करत ती पटकन बिलगली आणि तिचे मुके घेऊ लागली….पोलिस मात्र हा सोहळा कौतुकाने बघत होते….

She is damn smart kid for her age…. पोलिसांनी कौतुक करत म्हटले…

मग सगळेच घटना सविस्तरपणे सांगायला घेतली गर्दीचा भर अचानक आल्यामुळे, तिचा हात सुटला एका घोळक्या बरोबर ती कसे कोण जाणे पण पुढे चालत गेली, लक्षात आले तेव्हा मम्मा बाजूला नव्हती म्हणून रडायला लागेल पण मम्मा ने शिकवले होते जेव्हा हरवू तेव्हा जवळच्या पोलीसला किंवा दुकान वाल्याला मम्मा चा नंबर डायल करून द्यायची रिक्वेस्ट करायची…म्हणून नि ती एका दुकानात शिरले पण लोकांच्या गर्दीमुळे दुकान वाल्याचे लक्ष काही तिच्याकडे गेले नाही म्हणून तिथून बाहेर पडून पोलिसाला शोधायला लागली, पोलीस पेट्रोल समोर दिसतात तिने हात करून पोलिसांना थांबवले आणि मोडक्यातोडक्या इंग्लिश मध्ये आपण हरवलो आहे आणि मम्माचा नंबर डायल करायला सांगितलं…

She’s is really a smart kid…and why not her mother seems a smart mom too…दोघं पोलीस एकमेकांशी बोलत असताना निनाद तिथे पोचलो आणि हे ऐकले तसे तो खजील झाला याचा प्रीतीला आपण म्हटले तुला एवढ से ही जमत नाही का ???

त्याने ही नीतीला जवळ घेत अनेक पप्प्या दिल्या…पोलिसांचे मनापासून धन्यवाद दिले..पोलिस ही हॅपी न्यू इअर.. स्टे सेफ करत निघून गेले….तसे निनाद, प्रीती समोर मान खाली घालून उभा राहिला….

I know Sorry …खूप छोटा शब्द आहे मी जे काही बोललो आणि वागलो त्याच्यासाठी पण जमले तर माफ कर….. टेन्शन आले होते म्हणून तोंडातून निघून गेले… नीती हरवली म्हटल्यावर डोळ्यासमोर काजवे चमकले, क्षणात नको नको ते डोळ्यासमोर येऊन गेले, त्याचा राग तुझ्यावर निघाला आय एम रियली व्हेरी सॉरी…..

इट्स ओके…होते असे ते टेन्शन मध्ये ….मी ही खूप घाबरले होते, निनाद मी मुद्दाम नाही केले रे…

माहित आहे…प्रित्स..सॉरी ना..अनाहूतपणे रागावून बोलून गेलो मी…खरंच सॉरी…त्याने कान पकडत म्हटले…तसे प्रीती ने त्याला माफ केले..चल सोड..बस झाले न्यु इअर….जाऊया घरी….

त्या रात्री, दोघा ही आपल्याच विचारात होते…झोपलीस ???

ऊहुऊ….झोपच येत नाहीं निनाद….कित्ती मोठे संकट टळले ना आज…काय झाले असते ते..आपल्याला इथली पोलिस स्टेशन पण माहीत नाहीत की जास्त माहिती नाही..आठवून अंगावर शहारा आला प्रीती चा…

नको ना विचार करुस, तू मात्र चांगले शिकवलं आहेस दोघांना ..मला नसते सुचले हे सगळे….निती ऐवजी प्रीतम असता तर .काय केले असते त्याने….??? त्याने काळजी ने विचारले…

निती स्मार्ट आहे, बोल्ड आहे..पटकन कोणाला ही आपलेसे करते..म्हणून निभावून नेते…प्रीतम च तसे नाही …तो मागे मागे राहतो..म्हणून काळजी वाटते त्याची…

काळजी नको करू..हुशार आहे तो पण..बारीक लक्ष असते त्याचे…आधी रिस्क घेत नाही आणि वेळ आली की बरोबर करतो सगळ्यांना…शांत आहे थोडा पण बुधु नक्कीच नाही ..मुलांनी शांत असणेच चांगले आणि व्यावहारिक पणा म्हणायचं ना तर प्रीतम कडे जास्त आहे निती पेक्षा…खरे तर दोघांमध्ये फक्त १.५ मिनिट चे अंतर आहे..पण स्वभाव टोकाचे आहेत दोघांचे…नितीं दिखव्याला भुलते लगेच ; प्रीतम तसा नाही आहे विचारी आहे …..ह्याना सांभाळताना मस्त टीम हांडलींग चे सगळी तत्व लावावी लागतात मला….

तसा निनाद हसला…बर आहे ना…अजून टच मध्ये आहेस ते…परत जॉईन होशील तेव्हा चांगलीच फैलावर घेशील सगळ्यांना….निती आणि प्रीतम समजून 😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝

निन्या..ऐक ना.. टेन्शन येते आहे…नवीन वर्षाची सुरुवात ही अशी झाली….माहीत नाही हे वर्ष कसे जाणार ते…पुढे काही टेन्शन नको रे बाबा…..

झाल्या का तुझ्या विचारांच्या चकल्या सुरु…कित्ती सांभाळू ग तुला..दमलो आता मी…म्हणत तिला जवळ ओढले…

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

नवीन वर्ष सुरळीत सुरू झाले..नवनवीन प्रोजेक्ट्स मध्ये निनाद गुंतला..आता आता त्याचे ट्रवेलिंग ही वाढले…सगळी कडे मीटिंग, डेड लाईन्सचा खेळ सुरू झाला…प्रीती आपली मुलांबरोबर मध्ये गुंतली…निनादला मिस करत एकटीच मुलांना सांभाळत होती…. घरांच्या ही आठवण येत होती..सोबत अभ्यास , वेगवेगळ्या अॅक्टिविटी मध्ये गुंतवून घ्यायचा प्रयत्न करायची…निनाद चे दर्शन आठवड्यातून एकदा दोनदा होऊ लागले मुलांना, व्हॉट्सअँप संसार सुरू झाला…बसा थोडे दिवस अजून, मग लवकर येतोच आहे मी..निनाद रोज हेच सांगायचं आणि प्रीती मान
डोलवायची..आता तर प्रीती ने ही त्याची वाट बघणं सोडून दिलेले…..

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

प्रीती चा वाढदिवस येत होता…निनादला काहीतरी स्पेशल करायचे होते…कुठे बाहेर घेऊन जाऊ?? की काहीतरी घेऊन देऊ? की अजून काही करू ? समजत नव्हते…पूर्वी सारखा तिला वेळ देता येत नव्हता हे खरे, नवनवीन जबाबदाऱ्या पासून सवड मिळत नव्हती, कंपनी मध्ये एक्सपान्शन प्लॅन्स होते…त्यासाठी सतत दौरे आणि मीटिंग असायच्या…नक्की काय करावे ते सुचत नव्हते….

अशातच , एक दिवस निनाद अचानक घरी आला….मीटिंग लवकर आटोपली होती म्हणून निनाद आतुरतेने घरी आला होता…घर लॉक होते..अचानक कुठे गेले सगळे…. सरप्राईज द्यायला गेलो आणि मीच सरप्राईज झालोय इथे !!

ना राहून त्याने प्रीती ला फोन केला…कुठे आहेस ???

बस पोचते आहे घरी..तू कुठे आहेस ? तिने आश्चर्याने विचारलें…आता ह्यावेळी ह्याचा फोन…कमाल आहे…बिझी आहे म्हणाला आणि मलाच फोन करतोय कुठे आहे म्हणून..म्हणत तिने घराजवळ गाडी पार्क केली तर निनाद स्वतःच्या गाडीला टेकून उभा…

डॅडी !!!!.म्हणत दोन्ही मुलं बिलगली…प्रित्तीला ही आश्चर्य वाटले..इतक्या लवकर हा घरी !!!

सगळेच घरात शिरले..पण प्रीती खट्टू झाली…मी एवढी हेअरस्टाईल बदलून आली तर निनाद ने साधे नोटीस सुधा केला नाही मला की विचारले नाही …कुठे गेलीस होती ते…पूर्वी छोट्यातील छोटी गोष्ट नोटीस करायचा कौतुक करायचा आणि आता बघा ….आजकाल लक्ष असते कुठे ह्याचे काय माहीत… चिडचिड करत पाय आपटत प्रीती वर निघून गेली…हिला काय झाले अचानक…त्याला प्रश्न पडला…..

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

उद्या माझे मित्र येतात आपल्या घरी नाश्तासाठी निनाद ने झोपताना म्हटले…

अचानक?? कोण आहे? मी ओळखते ??

प्रीती ने वैतागून विचारले…एक तर आज निती आणि प्रीतम ने मस्ती करून करून वैताग आणला होता…त्यातून निनाद लवकर येतो सांगून उशिरा आला आणि वर तिचा वाढदिवस ही विसरला होता….काहीच सरप्राइज नव्हते…..म्हणून अजूनच राग येत होता आणि उद्या मित्रांच्या टोळक्याला बोलवत होता शाहणा..म्हणत तिने ही रागाने म्हटले …

ठीक आहे !!!!..येऊन दे गॅंग ला…म्हणत सरळ लाईट बंद करून झोपून गेली….

रागावली आहेस त्याने हळूच विचारले….

नाही..दमली आहे आज…झोपू दे मला … गुडनाईट…

गुडनाईट…..त्याने हिंगोंड फिरवत म्हटले…

दुसऱ्या दिवशी सकाळीच निनाद तयार झाला…काय रे …टीशर्ट मध्ये आज?? ऑफिस नाही का?? अजुन ही तिचा राग गेला नव्हता… विश जे केले नव्हते…कोणालाच काही पडली नव्हती ना…ना मुलांच्या लक्षात न नवऱ्याच्या …काय करणार…!!!

काय करतेय ..वाह पोहे आणि कटलेट ..मज्जा आहे…माझ्या मित्रांची…. खूप ऐकले आहे तुझ्या कुकिंग स्किल्स बद्दल आज होऊनच जाऊ दे…

तसे रागाने तिने चमचा आपटला.. जा आता…उगीच मस्का नको मारुस…!!!!

निनाद निघताच, प्रीतीने भरभर घर आवरून घेतले छान नवीन कुर्ती घालून तयार झाली आणि देवपूजेला लागली….

देवा या माझ्या नवऱ्याला थोडी तरी अक्कल दे आज माझा वाढदिवस आहे आणि हा प्रिन्सेसचा वाढदिवस विसरला आहे…तस्सा चांगला आहे पण कधी कधी बघ ना कसा वागतो ते…पण हाच हवा हा !!! पुढे पण सात जन्मासाठी बाप्पा..हे मला बर्थ डे गिफ्ट हवे हा तुझ्याकडून अर्थात ही मागणी काही बदलत नाही हा दरवर्षी प्रमाणे…..म्हणत तिने गोड शिरा ची वाटी देवासमोर ठेवला आणि नमस्कार केला आणि निती प्रीतम ला उठवायला गेली….

थोड्याच वेळात निनाद गाडी घेऊन घरी आला…कधी ही हॉर्न ना बजावणारा निनाद…..गाडी लावताच आज एकदा नाही तर दोनदा हॉर्न मारला…

जरा धीर नाही ह्याला…असा काय वागतोय आजकाल….म्हणत तिने कसाबसा हसरा चेहरा करत दार उघडले आणि बघतच राहिली……

काकी….आई!!!!!!

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

https://littlesecretmusings.wordpress.com/

सेम कथा माझ्या वर्डप्रेस ब्लॉगवर सुधा उपलब्ध आहे…

खुलासा…

बरयाच वर्षांनी ती दिसली..तशी दिसत होती अजूनही कदाचित त्यामुळेच तर ओळखले……. कॉलेज नंतर आज दिसत होती..कित्ती वर्ष झाली त्याला, १५ वर्ष तर नक्कीच….वयाने थोडी स्थूल झालेली दिसत होती..पण चेहरा तोच..

होय तीच असावी…..हाक मारावी का?? काय करावे ?? ह्या विचारात शेवटी हाक मारलीच…….

अनिता…..अनिता ना तू ? २००१ बॅच ?? आदर्श कॉलेज??

क्षणभर तिने ही आश्चर्याने बघितले…..चेहरा तर ओळखीचा वाटतोय…पण कोण ते लक्षात येत नाही आहे…

सॉरी पण मी ओळखले नाही तुम्हाला…!!!!!!!

कशी ओळखशील!!!! माझे वय वाढले आहे..केस ही गेले, मी विकास पाटील…तुझ्या कॉलजला नव्हतो तरी आपण ओळखायची एकमेकांना…काही आठवत का??? त्याने ही नेटाने विचारले……

क्षणभर तिचा चेहरा पडला..जुन्या आठवणी ने जखमेवरची खपली कोणी खरर कन खेचून काढावी आणि तरी ही रक्त भलभाळून वाहायला लागते तसे झाले…पण क्षणभरच, तिने लगेच स्वतःला सावरले..

अरे तू !!! कसा आहेस विकास ? कुठे असतोस? इथे काय करतोयस?? इथे कुठे? भरभर तिने प्रश्न विचारायला सुरुवात केली…तसे तो सुखावला..

आपल्याबदल थोडक्यात सागितलं आणि तेवढ्यात तिच्या नवऱ्याचा कॉल आला म्हणून निघाली…जाताना आपला मोबाईल नंबर मात्र देऊन गेली…

तो ही निघाला.. ..मन मात्र भूतकाळात रमले..अनित्ता देसाई…हसरी मुलगी, हुशार , कॉन्व्हेन्ट मध्ये शिकलेली, जिथे आम्ही एक एक वाक्य जोडून जोडून बोलायचो तिथे ही पटपट इंग्लिश मध्ये संवाद करणारी , देश विदेश फिरलेली, सुंदर मोठे चॉकलेटी ठाव घेणारे डोळे, छोटीशी जिवणी, दिसायला सुंदर… कोणे एके काळी आपल्याला ही आवडणारी, मनाच्या तारा छेडणारी…आपल्याच एका मित्राची गर्लफ्रेंड…

खरे तर अनिता आणि अनुराग…एकदम हीट कपल कॉलेज मध्ये…अकरावी बारावीला एकत्र कॉलेज मध्ये..त्याला ती आवडली, अगदी पहिल्याच नजरेत भरली…अर्थात तो काही एकटा नव्हता..

पण अनिता पटली ते फक्त अनुरागला…दोघा छान दिसायचे एकत्र…बारावी नंतर तो इंजिनिअरिंगला गेला तर तिने Bsc साठी एडमिशन घेतली…पण प्रेम प्रकरण सुरू राहिले, कधी कॉलेज मध्ये, कधी बागेत भेटत, कॉलेज मध्ये सगळ्यांचं ह्यांचे प्रेमप्रकरण माहीत होते..पण दोघा ही आपल्या अभ्यासात हुशार, सगळ्या परीक्षेत फर्स्ट क्लास मध्ये पास होणारे…..

पुढे जाऊन हे दोघा लग्न करणार हे जणू ठरलेलेच.दोघा ही आकंठ एकमेकांच्या प्रेमात बुडलेले..

आम्ही मित्र मंडळी बरयाच दा त्यांचा बरोबर टाईमपास करायचो, अनुराग चा हेवा वाटायचा सगळ्यांना..अनिता सारखी मुलगी पटवली होती त्याने…दोघांचे सुरुळीत चालले होते ..अगदी अनिता चे पोस्ट ग्रॅज्युएशनला जाई पर्यंत आणि अचानक बातमी आली ..ह्या दोघांचे ब्रेकअप झाले ते…काय झाले काही कळायला मार्ग नव्हता…

अनुराग मात्र सगळीकडे अनिता ची बदनामी सुरू केली, तिने विश्वास घात केला असे म्हटले जाऊ लागले मित्र मंडळी मध्ये..सगळ्यांनीच हळू हळू अनिताशी बोलणे सोडले……नंतर नंतर सगळ्यांशीच संपर्क तुटला..कॉलेज संपले तसे विखुरले सगळे…

मध्ये मध्ये कधीतरी बातमी कळाली, अनिता चे लग्न झाले आणि ती दुबईला गेली..अनुराग ही शिकून अमेरिकेला स्थाईक झाला….

एक लव स्टोरी अशीच संपली काय कारण होते नक्की कोणालाच कळले नाही.. मनात अनेक प्रश्न होते ज्याची उत्तर कोणाकडे नव्हती..पण आज ही अनिता दिसल्यावर…अनुराग ची आठवण आल्याशिवाय राहिले नाही…हे ही तितकेच खरे..

दोन तीन दिवसांनी ना राहून शेवटी फोन केला अनिताला., त्यादिवशी बदल माफी मागितली तिने बऱ्याचदा…हळूहळू गप्पा सुरू झाल्या..अधून मधून व्हॉटसअप बर मेसेज आणि कधीतरी बाहेर भेटायचो आम्ही ..

आमची नवीन मैत्री ही सुरू झाली होती..अशातच एक दिवस लवकर मीटिंग संपली, मी मोकळा झालो म्हणून तिला फोन केला..ती ही मोकळीच होती..कॉफी प्यायला येतेस का विचारल्यावर लगेच तयार झाली…

इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यावर, ती न ना राहून विचारले ..एक विचारू विकास ..तिने हळूच विचारले..

मी सावध, लगेच जाणवले काय विचारणार ते…अपेक्षित होतेच मला ही कुठेतरी, जाणून घ्यायचे होते नक्की का वेगळे झाले ते..

कसा आहे तो? तिने हळूच विचारले….टच मध्ये आहे ना तुझ्या??

आहे ना…….आज इतक्या वर्षांनी आठवण काढलीस ते…कमाल आहे अजून लक्षात आहे तो..

तसे ती उदास पणे हसली…जाऊन दे…उगीच विषय काढला..सोड ..विसर मी काही विचारले ते…..

सांग ना…अनिता..काय झाले तुमच्या मध्ये??? नाही इतके प्रेम करणारे तुम्ही ..असे कसे वेगळे झालात…काय झाले अचानक ??? का फसवले त्याला?? का विश्वासघात केलास त्याचा?? काय चुकले त्याचे ??

अनुराग चा राग, त्याचे रडणे उदास जवळून पाहिल्यामुळे कुठेतरी अनिता बदल राग होताच मनात.. मी काकुळतीला येऊन विचारले…आज सत्य जाणून घेतल्याशिवाय इथून जाऊन देणार नव्हतो…

बराच आढेवेढे घेतले अनित्ताने…

सोड ना…कित्ती वर्ष झाली त्याला..त्याला मी आठवत पण नसेल आता…बोलून काय फायदा…वैगरे वैगरे…

शेवटी कशीबशी तयार झाली, पण अनेक वचन घेऊनच…

आम्ही खूप फिरायचो, एकमेकांच्या सहवासात सगळेच विसरायला होत होते, प्रेमाच्या धुंदीत होतो , सगळ्या कॉलज भर माहीत होते, आधी आधी सगळे चिडवायचे, मग सगळ्यांनाच सवय झाली होती आमची.. आकंठ एकमेकांच्या प्रेमात बुडलेले आम्ही,शिकायचे पुढे काय जायचे मग लग्न करू असे ठरवलेले…सगळे काही जणू सेट होते….पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते बहुतेक…

आधी आधी चांगला वागणारा अनुराग नंतर नंतर मात्र त्याचा स्वभाव विचित्र होऊ लागला होता…उगीच पॉसोसिव वागायचे, ह्याशी बोलू नकोस त्याच्याशी बोलू नकोस हे नको घालू ते नको घालू वैगरे वैगरे सुरू असायचे…ते थोडे नाही म्हटले तर खटकायचे…त्याच्यावरून वाद व्हायचे आमचे खूप..खूप भांडायचो आम्ही….पण परत एकत्र व्हायचं…

अशातच माझ्या घरी कुणकुण लागली..कोणी सांगितले माहीत नाही पण घरचे उठ सुट नजर ठेवायला लगले..

प्रत्येक फोन कॉलला बाजूला येऊन उभा राहिला लागले…संशय आला होता…थोडी सावध गिरी बाळगायला पाहिजे होती..अाधी अनुराग ने साथ दिली, मग मात्र तोही चिडचिड करू लागला होता…रोज भेट म्हणायचा,नाही भेटले तर चिडचिड सुरू, मग भांडण, रोज हे चालायचे, वैताग आला होता , इथे आड तिकडे विहीर झाले होते .. ..अभ्यासायातून लक्ष उडालेले..नशीब कधी मार्क कमी पडले नाहीत एवढेच….नाहीतर काही धडगत नव्हती….

अशातच एक दिवस आई ने मला फोन वर बोलताना पकडले…खूप प्रश्न विचारले…खर सांगण्याशिवाय दुसरा काही पर्याय दिसला नाही तेव्हा…. हिंमतच नाही झाली काही खोटे बोलयाची म्हणा..बस सांगून टाकले घरी …जे काही होते ते…ऐकल्यावर आई ने संकन एक कानाखाली वाजवली ..कधी ही हात न उचलणारी आई ने सरळ एक थोबाडीत ठेवली…तेव्हा वाईट वाटले…वाटेल तशी बोलली…अर्थात तिचे काही चुकत होते असे नाही ….

माझ्या घरचे सगळेच उच्चशिक्षित, बाबा आय पी एस, भाऊ अमेरिकेत शिकणारा, त्यामुळं माझ्याकडून ही तीच अपेक्षा, शिक्षण पहिले , त्यात मी आख्या घरण्यात एकुलती एक मुलगी, बरेच वर्षांनी झालेली…म्हणून आई बाबा जास्त जपायचे, उगीच काही उच नीच व्हायला नको..मला मात्र सगळेच वेडेपणा वाटायचं….कदाचित ते वयच तसे होते…

तर अनुराग ची गोष्टच वेगळी, त्याच्याकडे ही सगळे शिकेलेल पण मध्यमवर्गीय कुटुंब…घरी चालणार नव्हतेच.

माझ्या घरच्यांची स्वप्नं वेगळी होती अनुरागपेक्षा..मग काय रोज ब्लॅकमेल सुरू, कॉलेजला जायचे तर त्याच्या वर नजर, फोन बंद ..सगळीकडून कोंडमारा…अनुरागला कितीदा तरी समजावाचा प्रयत्न केला..पण तो ही ऐक्याच्या मूड मध्ये नसायचा..सतत चिडचीड करायचा..मिलेत तो थोडा वेळ प्रेमाच्या गोष्टी बोलण्यात घालवाच्या ऐवजी प्रेम सोडून भांडण जास्त होत होती आमच्यात….आधीच विश्वास, प्रेम, संवाद कुठेतरी हरवत चालला होता…दोष दोंघाचा ही होता..पण माघार कोणीच घेत नव्हते..

अशाच एकदिवस बाबांच्या मित्राने आम्हाला स्टेशन वर पहिले…झाले घरी कळले…आधी फक्त आई ला माहीत होते आता बाबा ना पण कळले होते..खूप बाचाबाची झाली घरी…मुलगी गेली हातातून असेच वाटले सगळ्यांना..घरण्याचे नाक कापलं मुलीने हे नक्की…

बाबा नी खूप मारले..मी ऐकणार नाही असे वाटल्यावर मग अनुराग च्या मागे लागले… त्याचे करिअर बरबाद करायला निघाले बाबा….बाबांचे संबंध तसे बर पर्यंत काहीही करू शकले असते.एखादी ड्रग ची केस टाकायला निघाले अनुराग वर..त्याने शिकून मोठे व्हावे हे त्याच्या घरांच्येच नाही तर माझी ही स्वप्नं होत.. आयुष्यात तून उठला असता अनुराग आणि त्याचे घरची ही…..

मग रात्रीत निर्णय घेतला ..कसेबसे थांबवले बाबा ना..थोड वेळ मागितला आणि अनुराग शी संबंध थोडा प्लॅन केला..

त्याच्याच पॉसिसिव पणा त्याच्यावर वापरायचा ठरवला..आपल्या मावस भावाला हाताशी धरले आणि सरळ अनुरागला सांगितले..माझे प्रेम आहे ह्याच्यावर तुझ्या स्वभावाला कंटाळले मी आता ..ब्रेकअप करते आहे…

खूप भांडलो आम्ही त्यावर…अर्थात माझी तयारी होतच त्याला पटवून द्यायचीआणि तसेच झाले..त्याला विश्वास बसला माझ्यावर मी विश्वासघात केला हे पटले त्याला…दुखावला तो ..खूप दुखावला… हे माहीत होते मला पण माझ्याकडे पर्याय नव्हता…मला जे त्या वेळी योग्य वाटले ते मी केले..चूक केले बरोबर केलं माहीत नाही….बस त्याच्या पासून दूर झाले…

पोस्ट ग्रॅज्युएशन व्हायच्या आधीच माझे लग्न ठरवले आई बाबांनी..शिक्षण कसेबसे पूर्ण केले..अनुराग ने त्या दिवसानंतर मला कधी फोन केला नाही की संबंध ठेवला नाही….मी काय बोलणार …अनुराग शिकत होता तेव्हा… घरचं चा विरोधात जायची हिम्मात नव्हती आणि अनुराग ला काही बोलू शकत नव्हती…झाले ते आपले नशीब समजून मी लग्नाला तयार झाले इतकेच….

खूप शिकला असे ऐकले, तो मोठा माणूस झाला आहे आता…म्हणून उर अभिमानाने भरून येते…बस इतकेच…बाकी काही नाही ….

अनुराग ने तुला एवढे बदनाम केले…काहीच का बोलली नाहीस तेव्हा.. माझा भाबडा प्रश्न……..

काय बोलणार !!!!..फसवले होते मी त्याला…स्तुती सुमन तर नाही ना उधळणार…मी जे काहीं केले ते माझे प्रेम होते…त्याने जे केले ते ही प्रेम् होते होते त्याचे ….उद्वेग होता त्याचा..मनापासून प्रेम केले होते त्यांनी माझ्यावर….

आठवण येत नाही त्याची?? सुखी आहेस आपल्या संसारात???

अरे सुख मानण्यावर असते विकास….मी सुखी आहे खरंच…नवऱ्यात अनुराग ला बघते……त्याचे ही प्रेम आहे की माझ्यावर……आणि अनुराग ही विसरून गेला असेल मला…

असे तुला वाटते अनित्ता…..राग गेला नाही तुझ्यावरच अजून….

माहित आहे मला…एक आपसूक विक मॉमेंट ला चुकून मी फेसबुक वर कनेक्ट झाली रे… नाहीं राहवले माझ्याच्याने….कोण एके काळी आयुष्यभराची स्वप्नं रंगवली होती त्याच्याबरोबर . पार अगदी आमच्या मुलांची ही नावं ठरवली होती आम्ही..तिने हलेकच आपले अश्रू थोपवत म्हटले…अश्रू थोपवत म्हटले…

..थोड्या वेळा आम्ही दोघंही स्तब्ध राहिलो..चल निघते मी….आपले दिलेले वचन लक्षात ठेव विकास…बस ह्यातले काही कळू देऊ नकोस त्याला..

अनिता..अगा…..तरी सांग कळू दे की त्याला…प्लीज….

काय होणार आहे त्याने विकास..?? २ २ संसार मोडतील, कोण सुखी होणार ह्यातून?? माझ्यावरचा राग, मला नीचे दाखवणे ही ऊर्जा आहे अनुराग ची…माझ्यापेक्षा जास्त कोणीच ओळखत नाही त्याला…खर सांगून त्याची ती ऊर्जा हिरवू नकोस…एवढीच ह्या मैत्रिणीची मागणी…म्हणत अनिता निघून गेली….

तुम्हीच सांगा…मी काय करायचे आता?? सांगावे की ना सांगावे …कोणाच्या मैत्रीला जागावे??? तुम्हीच सांगा…..

#33 Bucket List

अनिकेत ने आपल्या भावना कशा बाशा आवरल्या आणि सगळेच स्टुडिओ मध्ये जाण्यासाठी निघाले…

स्टुडिओ ही एक रंगीन दुनियाच होती, अनेक जण एकाच वेगळी वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करताना दिसत होते..आपले नाव रिसेप्शन वर सांगून तिघांना ही असायला सागितले..थोड्याच वेळात एक मुलगी त्यांना घ्यायला आली..तिच्या मागोमाग कुतुहलाने बघत एके एक रूम पर करत सगळे एका स्टुडिओ रूममध्ये येऊन बसले. घेऊन येणाऱ्या मुलींनी आपली ओळख सांगितली आणि तन्वी, निशाला आत पाठवले…तन्वी वर लगेच थोडा मेकप का टचप करण्यात आला….एक निवेदिका येऊन तिला भेटून गेली…थोडे जुजबी बोलून, तिचे टेन्शन कमी करून थोड्याच वेळात आपण शूट करू म्हणात निघून गेली….सगळी अजबच दुनिया वाटत होती…अनेक लोकांची लगबग, धावाधाव, पळापळ, गोंधळ कुतूहाने बघत होते…

बराच वेळा ने ती मुलगी परत आली आणि सगळे रेडी असल्याचे सांगितले तसे तन्वी ला अजूनच टेन्शन आले…घाबरत घाबरत ती त्या मुलीच्या पाठी गेली..निशा ने तिला हात घट्ट धरून बेस्ट लक केले…आणि आश्र्वस्त केले…तरींही तन्वी चे टेन्शन काही कमी होत नव्हते.हलकेच तिची थरथर जाणवत होती…चेहरा ही पांढरा फटक पडला होता…पण निवेदिकने तिला कॅमेरा समोर बसवले..थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या..हातात एक स्क्रिप्ट दिली..कॅमेरा कडे कसे बघायचं कसा अंगेल असेल, माईक वर आवाज कसा येईल ह्याची थोडीफार रेहर्सेल केली….तसे थोडे टेन्शन कमी झाले…

शूटिंग लांसुरुवत झाली…अँक्शन कमेरा रोलिंग साऊंड म्हणत… स्पॉटलाईट निवेदिका वर आले आणि ओपनिंग लाईन्स देऊन मग तन्वी वर आले…तसे तन्वी ने शिकवल्या प्रमाणे नमस्कार केला आणि मुलाखतीला सुरुवात झाली….

सुरवातीला सुरवातीला तन्वी थोडी घाबरली, चाचरत उत्तर देऊ लागली..तसे एक दोन टेक परत घेतले मग मात्र तन्वी थोडी रेलक्स झाली….अनिकेत ने तिला काही टिप्स दिल्या..निशा ने तिची हिम्मत वाढवली… निवेदिके ने ही संभाळून घेतले…होते असे पहिलीच वेळ आहे …भीती वाटतेच…

तन्वी ने नंतर मात्र आपल्या मनातली भीती कमी झाली तसे परत सुरुवात केली…विचारलेले प्रश्न त्यांची उत्तर तिने कॉन्फिडन्स ने दिले, आपले पुढचे प्लॅन्स, कार्यपद्धती , सध्याचे प्रोजेक्ट्स ह्यावर चर्चा करत खुमासदार उत्तर दिली…आणि मुलाखत संपवली…

शूटिंग संपले तसे सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला…इंटरव्ह्यू खूप चांगला झाला होता.फायनल एडिट करून तन्वी ला पाठवण्यात येत होतं…मगच ओन एअर जाणार होती..मकाही एडिटिंग, बाकीचं लोकांच्या मुलाखती घालून फायनल फिल्म ४/५ दिवसात हातात येणार होती..सध्यातरी इथले काम आटोपले होते..तिचे काही फोटो काढून घेण्यात आले …व्हिडिओ मध्ये वापण्यासाठी आणि मग सगळ्यांना निरोप देण्यात आला…प

चिवचिवाट करतच तिघा बाहेर पडले…एव्हाना चागलीच दुपार झाली होती…पोटात कावळे जे एवढ्या वेळ झोपले होते आता अचानक काव काव करायला लागले होते…कुठेतरी जाऊन मस्त जेवू या..आज तन्वी कडून पार्टी म्हणत निशा ने तन्वी ला तयार केलें..तन्वी ने ही आढेवेढे न घेता पटकन पार्टी द्यायला तयार झाली….

निशा ने मग एक चांगले से हॉटेल शोधले आणि तिघाही निघाले…अनिकेत ने त्या आधी एक दोन फोन केले आणि मग सगळे निघाले…

निशा ने एक चांगले रेस्तुरांत शोधले होते..थोडे शहराच्या बाहेर, रिसॉर्ट टाईप असे मस्त ग्रीनरी असलेलं हे एक नावाजलेली जागा होती…..छान एकांतचे टेबल पकडून तिघा ही बसले..अजून हि आपल्या स्टुडिओ आणि शुटींग बदल गप्पा मारत होते…एवढ्यात अनिकेत ने निशाला काहीतरी इशारा केला…

मी येतेच जरा फ्रेश होऊन..तुम्ही ऑर्डर द्या तो पर्यंत ओके…म्हणत निशा तिथून सटकली..अनिकेत ने तो मोका बघून महतले…तन्वी आज तुझा स्पेशल डे आहेस म्हणून आपण सेलिब्रेट करत आहोत…आणि एक स्पेशल माणसाशी तुझी ओळख करून द्यायची आहे…होप तुला ती व्यक्ती आवडेल….ओपन माईंड ठेव बस…

थोड्याच वेळात निशा आणि एक छान हँडसम दिसणारा मुलगा हातात एक केक घेऊन आले…

जवळ येताच, तन्वी ने ओळख करून दिली, तन्वी हा आहे डॉक्टर विरेन, माझा बॉयफ्रेंड आणि हो तुझ्या आजच्या शूटिंग चे सगळे श्रेय ह्याला जाते हा…

काँग्रगुलेशन्स तन्वीदी..We are all so proud of you…म्हणत त्या मुलाने हात पुढे….

Thanks..तन्वी ने हात मिळवला…

अनिकेत तर आधीपासूनच विरेन ला ओळखत होता, त्यामुळे अनिकेत ने संभाषण सुरू केले. आपलं यूट्यूब चे व्हिडिओ ची आयडिया..त्यावरून विरेन ला सुचलेली टीव्ही वर मुलाखत ही आयडिया, त्या मागचे काम, कॉन्टॅक्ट शोधणे, त्यांना तयार करणे वैगेरे विरेन ने आपल्या मित्रा करवी केले होते, पडद्या मागे राहून….

हे सगळे ऐकून तन्वी दंग राहिली…त्याला एकदा नीट न्याहाळून घेतले. उंच पुरा विरेन पक्का पंजाबी मुंडा वाटण होता, त्यावबरोबर त्याचा चेहरा देहपोली एक उच्चशिक्षितांना ची साक्ष देत होती, बोलणे मृदू होते, आदबशीर वाटत होते, निशाशी बोलताना त्याचे तिचे मत ऐकून घेणे, त्याचा आदर करणे, हळूच नजरेने आपले प्रेम व्यक्त करणे सुरू होतेच… एक डॉक्टर म्हणून आश्वासक personality होतीच सोबत निशाला खुश ठेवेल ह्याची गवाही ही….काही माणसं पहिल्याच भेटीत मध्ये क्लिक होतात…तसे काहीसे झाले तन्वीला ..तिने ही मनापासून संभाषणात सहभाग घेतला….

जेवता जेवता भरपूर गप्पा झाल्या…विरेन आपल्या बदल सगळे सांगितले…आई बँकेत नोकरीला तर वडील प्रायव्हेट मध्ये नोकरीला.. आजोबांच्या नोकरी निमित्त पुण्यात स्थाईक झालेलं कुटुंब…बाकी सगळे कुटुंब दिल्लीत…अजूनही घनिष्ठ संबंध…विरेन च बालपण पुण्यातले..सगळ्या मराठी वातावरण गेलेले..मराठी सोबत पंजाबी व्यवस्थित बोलता यायचे…अनेक मराठी कुटुंबाशी घनिष्ट मैत्री…

चला आता केक कापू या का आता ??…विरेन ने म्हटले…मला हॉस्पिटलला जायचे आहे परत..प्लीज..

Congratulations ..लिहिले मस्त चॉकलेट केक…..बघूनच तन्वी खुश झाली.. अनिकेत आणि विरेन कडे बघतच तन्वी ने केक कापला…लगेच निशा ने तन्वी ला भरवले…आणि थोडासा तिच्या गालावर लावला….अनिकेत ने भराभर सगळ्यांचे फोटो काढले…

थोड्याच वेळात विरेन निघाला…जाताना तन्वी चा हात हातात घेऊन म्हणाला…तन्वी दी…प्लीज काही चुकले असेल तर माफ करा, माझे निशा वर खूप प्रेम आहे मी तिला खूप सुखात ठेवेन …हा माझा शब्द आहे ….

विरेन निघाला तसे निशा त्याला सोडायला गेली…अनिकेत ने तिला काहीतरी इशारा केला..तसे दोघांनी अंगठा दाखवत हसत निघाले…

हे काय होते…?? तन्वी ने न राहुन विचारले…

काही नाही…लव बर्डस बाहेर फिरायला गेलेत…फक्त निशा निघाली की फोन करेल म्हणजे तुम्ही दोघी एकत्र जाल ना घरी….

अरे देवा..घरी सांगितलेच नाही अजून….काम झाले ते …म्हणत तिने फोन काढला.. कोणाचे ही फोन नव्हते…हे बघून आश्चर्य वाटले..

निशा ने केव्हाच फोन केला घरी..आपण लंच करायला बाहेर जातो आहे ..मग तू ऑफिस ला जाणार आहेस आणि ती कॉलेज ला…हे सांगितले आहे ..सो तू संध्ाकाळपर्यंत माझ्याबरोबर आहेस….

निघू या…म्हणत तन्वी निघाली..

अनिकेत आणि ती गप्पा मारत मारत असेच लाँग ड्राईव्ह ला चालेले होते…विरेन आणि निशा बदल बोलत होते..बोलता बोलता विषय तन्वी आणि अनिकेत कडे वळला.. अनिकेत आपल्या भावना व्यक्त करायचा प्रयत्न करत होता आणि नेहमी प्रमाणे तन्वी त्याला टाळत होती….

खरंच तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का?? त्याने तिच्या डोळयात बघत म्हटले…तसे तन्वी ने ही त्याच्या नजरेत नजर मिळवत म्हटले..खरंच अनिकेत काहीच नाही वाटत तू फक्त मित्र आहेस आता….

पुढे काही बोलायच्या आधीच अचानक गाडी समोर कुठून तरी एक ट्रक आला…आणि त्या पासून वाचण्याच्या नादात….अनिकेत ने गाडी वळवली…आणि त्याचा गाडी वरचा कंट्रोल सुटले… अन्वी……..ही शेवटी ची हाक अनिकेत ने मारलेली हाक फक्त तन्वी ला ऐकू आली…आणि काही कळायच्या आधीच….गाडी जोरात आपटली……

दोघा ही गाडीतच बेशुद्ध झाले…..आणि इथे ट्रक लांब निघून गेला….

30 : Ek Choti Si Love Story Season 2

सगळे तयार होत होते आणि इथे निनाद पटकन बाहेर जाऊन एक पार्सल घेऊन आला….ते बघून प्रीती ला प्रश्न पडला…नक्की काय प्लॅन केले आहे ह्याने?? काहीच कळून देत नाही आजकाल हा…

सगळेच तयार बाहेर पडले. निनाद ने कार बुक केली होती..पत्ता देऊन सगळेच निघाले..बाहेरच्या गमती जमती बघत होते..शहरापासून थोडे लांब आले आणि आता फ्रेमोंत ची वसाहत सुरू झाली….नक्कीच ह्याचा कोण तरी आयआयएम वाला मित्र असणार…त्याच्याकडे जात असणार आपण…..प्रीती ने मनातल्यामनात विचार केला.आणि शांत बसली…. मुलं ही आपल्यातच मग्ना होती…तिने हळूच निनाद खांद्यावर डोके टेकवले…

दमलीस ???? त्याने चमकुन विचारले…

ऊम्म हू ..असच…तिने हसून म्हटले…तुझ्या मित्राकडे चाललो आहे राईट….

हम््मम राईट…म्हणत त्याने टॅक्सी एका ठिकाणी थांबवली आणि फुल विकत घेतली….

नक्कीच मित्र नाही मैत्रीण आहे ह्याची बहुतेक…प्रीती चा मनात आले….

चल…आले आपले ठिकाण.. म्हणात त्याने टॅक्सी थांबवली….छान १ माजली घर होते…बंगले बंगले दिसत होते..बाहेरून च वाटत होते घर आतून खूप छान असणार ..नक्कीच एका उच्रभू सोसायटी मध्ये आले होते.
घर नंबर नीट बघून त्याने बेल मारली….

कमिंग……..!!!!!!
असा मंजुळ आवाज येत…थोड्याच वेळात दार उघडले…..आणि प्रीती ने अा वासला.

अनु!!!!!!!! प्रीती, निनादला जवळ जवळ धक्का मारताच अनुच्या मिठी शिरली……

कित्ती तरी वर्षांनी दोघी भेटत होत्या….हो तो पण तूर्तास तरी तो बाजूला पडलेला होता…प्रीती अनुजाला भेटलेली ते लंडनला जाताना भेटलेली तेव्हा ..नंतर कधीतरी चॅटिंग चालायचे तेवढेच….

हे बरे आहे हा…मी सगळे प्लॅनिंग केले आणि तुम्ही दोघी मला विसरले.. नॉट फेअर हा…

ये हा तू पण ..म्हणत प्रीती आणि अनुने त्याला लहानपणी जसे ढकलत होते तसे ढकलेल…आणि हसायला लागल्या…..
तिघाही मग खो खो हसत सुटले…..आज कित्ती तरी वर्षांनी तिघा एकत्र होत लहानपण अनुभवत होते…..त्यांची हे मज्जा प्रीतम निती आणि इथे अनुजाचा नवरा (आशिष) आणि मुलगी (श्रेया) मात्र हा भरत मिलाप थोडे कौतुक थोडे आश्चर्याने बघत होते….

थोड्याच वेळात तिघा भानावर आले आणि घरात शिरले…..अनु ने प्रीती , निनाद आणि मुलांची ओळख करून दिली….प्रीती ला प्रीती मावशी म्हणतच निनाद श्रेयाला म्हणाला….ती मावशी नाही तुझी…..मामी आहे…अनु मला शाळेत असताना राखी बांधायची ..आठवते का विचार तुझ्या मम्माला….!!!!

अरे हो…खरेच की..निनाद मामा अाहे हा तुझा….अनुजा हसत म्हणाली… निन्या ..तुला आठवत…प्रीतीला पण बांधायची असायची तुला राखी…पण तू कधीच तिच्या तावडीत सापडला नाहीस…तिने हसत म्हटले…

अरे आपले फंडा क्लिअर होता ना लहानपणापासून….. काय अनु?? त्याने हसत म्हटले…

म्हणजे अनु ला माहीत होते ??? कधी बोलली नाहीस ते…!!!!

सगळे मनातले सांगेल तो निनाद कसला , कधी ह्याने सरळ सांगितले नाही पण मला डाऊट होताच …तुझा फोटो बघितलेला एकदा त्याच्या रूम मध्ये……आय थिंक दहावीत होतो तेव्हा…तुला सांगते..कुठे होता ते..त्याच्या बेडचा बाजूला ना आईबाबा बरोबर एक फोटो होता त्याच्या मागे लपवलेला त्याने ……अनु ने हसत म्हटले…

व्हॉट!!!! निन्या तू कधी सांगितले नाहीस हे !!!

ए अनुडे ..गप्प बस की आता…का उगीच सेक्रेट सांगत बसते….

सगळेच आपल्या जुन्या आठवणी मध्ये रमले….निनादला लंडनची आठवण आली…ह्या गोष्टी नंतरच तर प्रीतीला प्रपोज केले होते…हे आठवून निनाद आणि प्रीती गालातल्या गालात हसले…

खूप वर्षांनी भेट असल्याने गप्पा संपतच नव्हत्या…..आशिष ही गप्पा मध्ये सामील झाला थोडावेळ…श्रेया, निती आणि प्रीतमला घेऊन आपल्या रूम मध्ये खेळवत होती…जेवण झाली तसे आशिष आपल्या रूम मध्ये गेला…आता फक्त निनाद , अनुजा आणि प्रीती फायर पलेस जवळ गप्पा मारत बसले होते…विषय हळूहळू कॉलेज, जुने मित्रमैत्रिणी, घरचे ह्याच्या आठवणी मध्ये रमले आणि शेवटी मंदार कडे वळला…

मंदार ची सगळी कहाणी ऐकून अनुजा दंगच राहिली….बाप रे एवढे सगळे झाले त्यानंतर ..कमालच म्हणायचे ..काय बोलावे हेच कळेना.. अनुला ह्या माणसं साठी मी ह्या सगळ्यांशी भांडले , कित्ती वर्ष अबोला धरला ह्याची लाज वाटली.ह्या दोघांची मात्र कमाल वाटली..एकमेकांना कित्ती छान समजून घेतात , प्रेम करतात, अगदी न बोलता ही मनातले ओळखू शकता दोघा..जणू वेगळे नाहीच हे… दो जिस्म एक जान टाईपस ..

सगळे झाले गेले विसरून प्रीती ने मैत्रीचा हात पुढे केला त्यावेळी…खरे तर गरज नव्हती…सगळ्यांना जवळ आणले परत तिने हळूहळू…अाता सगळेच टच मध्ये आहेत ते ह्या दोघामुळे…जुन्या मैत्रीला जागले दोघंही… अनु मनोमन विचार करत होती…..

शेवटी निनाद मुलांना झोपवयला गेला आणि प्रीती आणि अनुजा दोघीच गप्पा मारत बसले…अनुजा ने हलकेच हात हातात घेऊन म्हटले…एक विचारू निनाद ला कशी काय लग्नाला तयार झालीस ? मंदार आणि त्याच्या मध्ये काहीच साम्य नाही… पोलस अपार्ट आहेत दोघा…तरीही त्याच्याशी लग्न केलेस ….

तशी प्रीती मनापासून हसली, माहीत नाही का अनुजा पण निनादच जवळपास असणे सुद्धा खूप आश्वासक वाटायचं, अगदी शाळे पासूनच, कॉलेजपासून ..इंजिनिअरिंगला असता मंदार ने जबरदस्ती केली, खूपदा फिजिकल व्हायची मागणी,मग उगीच चोरटे स्पर्श, जबरदस्ती….तेव्हा कळले नाही का ते, पण तेव्हा निनाद आणि प्रिया सारखे बरोबर असायचे..

कित्तीदा तरी निनाद समजवायचा सोडून दे त्याला, स्वतःचा भावना मला न सांगता, पण माझी कधी हिम्मत नाही झाली म्हण किवा धुंदी होती मनावर कसली तरी…मंदार इथे शिकायला आला आणि खर सांगू कुठे तरी जाणवले…कदाचित एकमेकांपासून लांब जातोय , हातातून निसटून जाते आहे काहीतरी….अक्षय प्रियाच्या साखरपुड्याचे वेळेला प्रकर्षाने हे जाणवले..पूर्वी सारखे आमच्यात काही उरले नाही ते तरीही नात तोडायची हिम्मत नव्हती किवा आपल्या बरोबर असे काही होऊ शकते हे स्वीकारायची कदाचित तयारी ही….

आमचे ब्रेकअप झाले तेव्हा नीनादच होता मला संभाळायला… त्याचे सतत अवतीभवती असणे, त्याचा आश्वासक स्पर्श ,सांभाळून घेणे कुठेतरी मनाला भिडले हे नक्की… मैत्रीच्या पलीकडे काहीतरी आहे हे जाणवायचे कधी कधी…त्याच्या डोळ्यातून दिसायचे बऱ्याचदा पण शाहणा बोलायचं नाही काही….भरपूर स्पेस दिली मला….स्वतःला ओळखायला, समजायला, नक्की काय हवे आहे ह्याचा विचार करायला… त्याने प्रपोज केले आणि होकारासाठी हट्टच धरून बसला तेव्हा विचार केला अनोळखी व्यक्तीशी लग्न करण्यापेक्षा निनाद काय वाईट आहे ?? चांगला शिकलेला आहे, स्मार्ट आहे, दिसायलाही चांगला, घरचे ही माहितीतले आहे , छान समजून आपल्याला, प्रेम करतो मग काय हरकत आहे ?? आपल्याबद्दल सगळी माहिती असून देखील एक्सेप्ट करण्याची तयारीही आहे..मग अजून काय पाहिजे??
अरेंज मेरेज केले असते तर कदाचित मला एवढं समजूतदार नवरा मिळाला असता की नाही ह्याची शंकाच होती … मग का नाही ?? बस एवढाच विचार केला तेव्हा…… नंतर मात्र नीनाद प्रेमात आकंठ बुडाली हा आणि असं काही वागला ना की अजूनच प्रेमात पडते त्याच्या..प्रीती ने लाजत म्हटले…

अच्छा ही कबुली मला मिळत नाही हा कधी…….म्हणत निनाद ने प्रीती ला टपली मारली……तसे तिघाही हसायला लागले…

चला निघू या….आता बराच उशीर झाला आहे….मुलं पण झोपली आता…..म्हणत प्रीती,निनाद हॉटेल वर जायला निघाला…अनुजा बराच आग्रह केला राहायचा पण उद्या दुपारचे परती चे फ्लाईट होते . सगळे पॅकिंग बाकी होते म्हणून मग दोघा निघाले.

बराच वेळ एकमेकांचा निरोप घेत होते… पायच निघत नव्हता….पुन्हा कधी भेट होईल माहीत नाही…प्रीती आणि निनाद ने तिला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले…माहेरी ये गा नक्की न्यू यॉर्क ला ……प्रीती ने तिला मिठी मारत म्हंटले तसे सगळ्यांचे डोळे पाणावले….

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

थँक्यू…फॉर एवरीथिंग …म्हणत प्रीती ने आपले डोके निनाद चा खांद्यावर टेकवले….थँक्यू म्हणायापेक्षा…golden words म्हटले असते तर चालले असते ना ..बाकी सगळ्यांना सांगशील माझ्याबद्दल …फक्त मला कळू देऊ नकोस… त्याने हलकेच थोपटत म्हटले…

हम्म मला वाटले आजकाल कळतं तुला माझ्या मनातले ….

थोड्याच वेळात सगळे हॉटेलला पोचले…आता चांगलीच झोप अनावर होत होती आणि सोबत थंडीही होती…प्रीतम ला उचलून नेताना निनादची चांगलीच दमछाक झाली….प्रीती ने नीतीला कडेवर घेतले होते….

ठीक आहेस ना ?? इतका का दमला तू?? प्रीती ने काळजी ने विचारले…मनात काहीतरी शंका आली…

काही नाही…..साहेबांचे वजन वाढले आहे बहुतेक…थकलो बस इतकेच….त्याला कसेबसे बेड वर झोपावत निनाद ने म्हटले तसे प्रीती विचारात पडली…

काय झाले असेल निनाद ला..हल्ली काम खूप वाढलं आहे म्हणतो..चिडचिड हिंचलते पण मुलांवर काढत नाही …दमतो, थकतो आजकाल…जेवणात सुधा लक्ष नसते आजकाल…मानले खूप.मोठीं जबाबदारी आहे डोक्यावर पण तब्येत सांभाळून राहिले पाहिजे..घरी गेल्यावर पाहिले लक्ष आता निनाद कडे द्यायला पाहिजे…विचार करत करत ती झोपेच्या अधीन झालो..इथे निनाद केव्हाच गाढ झोपला होता….

#32 Bucket List

32 बकेट लिस्ट

अनिकेत, तन्वी ला सोडून तिथून निघून गेला…काय बरं केलं की तन्वी आपला हट्ट सोडेल.आणि आपल्या मनाचे ऐकेल ह्याचा तो विचार करू लागला…

तन्वी ला मनवण्यासाठी त्याने प्लॅन करायला सुरुवात केली..सकाळी सकाळी तिच्या डेस्क वर रोज गुलाबाचे फुल येऊ लागली, कधी चॉकलेट चे बॉक्स, कधी एखादे नवी रेस्तुरांत उघडलेले असेल त्याची signature डिश खायचे आमंत्रण ..तर कधी प्रेमाच्या कविता आणि इमेल्स…आता तर तन्वीची ऑफिस मधील जागा ही बदलली होती,बरोबर अनिकेत ला काचेतून नीट तन्वी दिसेल अशी त्याने व्यवस्था केली होती….आणि तन्वी ने ही नजर उचलली की अनिकेत समोर दिसेल अशी व्यवस्था….

सकाळी तन्वी ऑफिस ला आली की, अनिकेत तिला केबिन मंध्ये काही ना काही कारण काढत बोलावून घ्यायचा आणि मग दोघा कामावर चर्चा करत कधी इतर गप्पा मारत कॉफी घेत…तन्वी चा हेरिटेज टूर चे सगळे प्लॅनिंग झाले होते…लवकरच बुकिंग ओपन करणार होते…त्यासाठीची मार्केटिंग स्तरेर्जी ठरवणे सुरू होते…शक्यतो हेरिटेज टूर ला सीनिअर सिटीझन असतात ही तन्वी ची आयडिया सगळ्यांनीच उचलू धरली…त्याप्रमाणे सोई, तयारी करणे सुरू होते..तन्वी चा घरी आजी होती त्यामुळे तन्वी ला सिनियर सिटिझेन ला लागणाऱ्या सोई, त्यांना सतत आपले माणूस बरोबर असणे ही कल्पना, गप्पा, गाणी भजन इतर सोई कशा देता येतील ह्याच्या चर्चा अनिकेत करत होता…त्यामुळे अनिकेत ला जास्तीतजास्त तन्वी चा सहवास मिळवता येत होता… आधी तन्वी ला लक्षात आले नाही पण नंतर नंतर मात्र तिला एक एक गोष्ट लक्षात येऊ लागली..तसे तिने दुर्लक्ष करायला सुरुवात केली…पण आपल्याला ह्या सगळ्या प्रकारामुळे उलट रागच येत आहे हे दाखवायचा तिचा प्रयत्न सुरू असायचा…तिने स्वतःहून ना कधी.पुढाकार घेतला न कधी आपल्याला अनिकेत चे वागणे आवडते आहे ह्याचा कधी सिग्नल दिला…

,🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

अशातच तन्वी ची मुलाखत ची वेळ ठरली. शनिवारी 11पर्यंत स्टुडिओ मध्ये जायचे होते..त्या आधी तिचे थोडे फोटो, माहिती, घरच्यांचा मुलाखती घेण्यात आल्या होत्या…तन्वी ला पहिलाच अनुभव, त्यामुळे टेन्शन ही येत होते आणि सोबत अप्रूप ही वाटत होते…सगळेच स्वप्नातच वाटत होते…ती रात्र तन्वी ने तळमळून काढली होती…अनामिक ते टेन्शन आले होते…..

सकाळी लवकरच उठून तिने आपली सगळी तयारी केली..परत परत सगळे प्रश्न आणि उत्तर पाठ केलीत..जणू 10 ची बोर्ड परीक्षेला चालली आहे…आरश्यासमोर उभे राहून आपले एक्स्प्रेशन , हातवारे ह्यांची परत प्रॅक्टिस केलीत…तिचे हे टेन्शन बघून निशा मात्र छान व्हिडिओ बनवण्यात मग्न होती आणि सोबतच तिला चिडवत ही होती…

चला मॅडम..तय्यार व्हायला घ्या आता…लवकरच निघावे लागेल आपल्याला…

वेळ आहे ना अजून..काय घाई आहे…म्हणत तन्वी ची टाळाटाळ सुरू होती.. शेवटीना राहून निशा ने तिने शॉपिंग केल्याल्या पैकी एक छान कुर्ती त्यावरचे मॅचींग सगळे बाहेर काढले…आणि तनु ला तयार व्हायला पाठवले…घाई घाई ने एका मैत्रिणी ला फोन करून बोलावून घेतले..इथे तनु आपले कपडे बदलून स्वतःचेच रूप न्याहाळत बसली होती…

डार्क ब्लू कलर ची कुर्ती त्यावर छान एम्ब्रोईडरी केलेली होती…सुंदर फित्तींग तिच्या आता फिगर अजूनच छान दिसत होते….केलेला डान्स आणि प्रॅक्टिस ह्याने तन्वी चे अतिरिक्त वजन कमी झाले होते…योग्य ठिकाणची चरबी कमी होऊन
छान वळणं आलें होतें, खांदे ही न पोक काढलेले वाटत होते…सल्सा ची पोज …सरळ खांदे ठेवून उभे राहावे लागते
…किती त्रास व्हायायचा आधी आता मात्र हेच सरळ खांदे तिचा स्टॅन्स आणि कॉन्फिडन्स दर्शवत होते…

आपल्या ह्या रूपा वर ती स्वतःच फिदा झाली हे खरे…खरंच आपल्या शरीरयष्टी प्रमाणे कपडे, रंगसंगती, त्यावर सगळे मॅचींग वैगरे नीट घातले तर आपण ही काही वाईट दिसत नाही ह्याचा नवीनच साक्षात्कार तन्वी ला झाला तसे ती छान लाजत लाजत हसून आपल्या ह्या नवीन रूपा लां न्याहळत बसली…थोड्याच वेळात निशा तिच्या पार्लरवाल्या मुलीला घेऊन आली…तिला बघतच तन्वी चा चेहऱ्यावर अनेक प्रश्न आले…

छान ड्रेस घातला आहेस तर थोडेसे हेअरस्टाईल आणि हलका मेकप जरुरी आहे ना…..म्हणत निशा ने तिला आरश्यासमोर बसवले आणि पार्लर वाली ला इशारा केला…तसे तन्वी ने आढेवेढे घ्यायला सुरुवात केली..पण निशा पुढे काहीच चालेल नाही…

हलके हलके बेस फाऊंडेशन करत तिने लाईट मेकअप केला, तन्वीचे डोळे हायलाईट केले आणि एक छान लिपस्टिक लावत तिचे छान लांब केस मोकळे सोडत त्याला छान सेट करून दिले…

हम्म..झाले..आत्ता हलकेच डोळे उघड ओके…मला तुझे पाहिले रिअँक्शन शूट करायचे आहे…म्हणत निशा ने कॅमेरा चालू केला…

तन्वी ने आपले हळूच डोळे उघडले…आणि स्वतःच्याच प्रतिबिंब कडे अा वासून बघत राहिली….नक्की मीच आहे ना..ह्याचा विश्वास तिला वाटत नव्हतं..हळूच तिने आपल्या गालावरून हात फिरवला…हो मीच आहे ही…एवढी सुंदर फक्त योग्य कपडे, थोडासा मेकप, हेअरस्टाईल बदलून आपण किती वेगळ्या दिसू शकतो ह्याचा तिला प्रत्यय आला आणि हलकेच तिच्या डोळ्यात अश्रू तरळले…मनोमन तिने अनिकेत चा मैत्रिणी ला धन्यवाद दिले….हे सगळे आपल्याला काय निशाला सुद्धा सुचले नसते….

आ हा..बिलकुल रडायचं नाही हा…!!!! सगळा मेकअप कारण होईल…निशा हसत म्हणाली..कसली दिसतेय यार तु…तू अशी पण दिसू शकते ह्यावर विश्र्वासच नाही मला…अशीच राहत जा ना रोज…मस्तच !!!!

शहाणी आहेस…माहीत आहे कित्ती किमती आहे ही कुर्ती….!!! तन्वी ने डोळे मोठे करत म्हटले……

दोघींनी बरेच सेल्फी काढत टाईमपास केला.शेवटी दोघी करतात काय म्हणून आजी आणि मामी बघायला आली….तन्वी ला असे तयार झालेले बघून दोघी क्षणभर बघतच राहिल्या….

बाय गो….अप्सरा दिसतेय गा तू तन्वी….आजी ने बोटे मोडत म्हटले…तसे तन्वी लाजली..मामी ने हळूच तिला काजलाच्या तिट, तन्वी चा कानामागे लावला….सीन आता सेन्ती होणारच म्हणून निशा ने लगेच सगळयांना फोटो आणि सेल्फी साठी रेडी केले….

फोटो काढा रे….उद्या लाईन लावावी लागेल हा तन्वी ला भेटायला….म्हणत निशाने पटापट फोटो काढायला घेतले….

थोड्याच वेळात अनिकेत ने निशाला फोन केला….चला गर्ल्स..केव्हाचा वाट बघतोय बाहेर…या आत्ता लवकर उशीर होईल नाहीतर….!!!! वैतागून अनिकेत ने म्हटले…हे अजून एक अनिकेत चे सरप्राइज निशा आणि अनिकेत ने ठरवलेले….तन्वी ला घेऊन अनिकेत जाणार होता…तन्वी ला तयार झालेले जे बघायचे होते ना त्याला…

इथे तन्वी ने कॅब आली म्हणून जोरात ओरडून सांगितले तसे सगळे भानावर आले…मग काय धावपळ सुरू !!! फटाफट दोघी बाहेर पडल्या, पटकन देवाला नमस्कार केला…आजी ने लगेच दहीसाखर ठेवली…आणि दोघींना नमस्कार करत दोघी बाहेर पळाल्या…

घरापासून २/३ मिनिटाच्या अंतरावर अनिकेत आपल्या गाडीत वाट बघत होता..निशा पुढे होती तर तन्वी आपली पर्स सांभाळत तिच्या मागे येत होती….अनिकेत ला बघताच निशा हळूच बाजूला झाली….आणि निशा ला बघताच राहिला…

गर्द निळ्या रंगाची कुर्ती त्यावर मॅचींग गोल्डन निळ्या रंगाचे झुमके…लांब केस आज पहिल्यांदाच मोकळे स्टाईल करून सोडलेले , हलका मेकअप त्यात एरवी विझलेली डोळे आज १०० चा बल्ब सारखे चमकत होते…डोळे छानच हायलाईट केलेले ती नजर हटतच नव्हती…
अनिकेत तिच्याकडे अा करून क्षणभर बघताच बसला
..तसे निशा ने त्याला जोरात चिमटा काढला….

पूर बघताच बसणार आहेस की काही करणार पण आहेस ..जा छान मोका आहे..म्हणत त्याला ढकलले…

अनिकेत ने लगेच पुढे होत..तिच्या कडे बघत हळूच नजरेने छान दिसते आहे असा इशारा करत ..तिच्या साठी गाडीचा दरवाजा उघडला…आणि उभा राहिला…तसे तन्वी अजूनच लाजली….गाल चांगलेच आरक्त झाले होते…ना राहून तिने ही अनिकेत चा कौतुकाचा नजरेनेच स्वीकार केला ….जशी शाळेत करायची अगदी तशीच हे बघून अनिकेत ही हसला….

तुमचा आँखो आँखो मे चा संवाद झाला असेल तर जरा गाडीत बसू या का…गरम होते आहे फार बाबा….म्हणत निशा ने हळूच तन्वी ला कोपर मारले…आणि अनिकेत ही हसला…

not done my dear friend.. इसका बदला लिया जयेगा हा !!!!….थांब तुला आणि विरेनला बघतो नंतर…म्हणत त्याने निशाला टपली मारली आणि निशा आणि अनिकेत दोघा हसत एकमेकांना चिडवत राहिले…त्यांचे इतके मोकळे वागणे तन्वी ला खूप आवडतं होते…खरंच किती छान मित्र झालेत दोघे इतक्या थोड्यावेळात…

चला मॅडम…आधी इंटरव्ह्यू नंतर तुम्ही आम्हाला पार्टी देणार आहेत ओके…काय निशा सांगितले की नाहीस प्लॅन ….

नोप….मी काहीच नाही सांगितले आहे हा..ठरल्या प्रमाणे…आधी इंटरव्ह्यू तर होऊन दे..मग सांगू….आधीच टेन्शन मध्ये आहे ना..तुझी मॅडम….!!!!!

ओके ..तन्वी प्लीज..This is a very big chance for you…stay clam and composed ….you will do well..don’t take any tension..it’s a recorded session so we can take retakes ok….प्लीज बी कॉन्फिडनट ,you are master in your field and a star as well…….म्हणत तिच्या हातावर हलकेच थोपटले..हळूच तन्वी ने आपला हात काढून घेतला आणि हसली…

निघू या….तन्वी ने विचारले….

,,🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿