आत्महत्या…

आजचा दिवस खूपच स्पेशल असा होता. मीनाताई ने आपली तयारी केली..छानशी तयारी केली उगीच पुन्हा एकदा आरशात आपले रुपडे बघून घेतले…हो उगीच नंतर लोकांनी बोलायला नको…म्हातारी होती हो अगदी….मनाशीच हसत त्याने आपली व्हील चेअर ढकलली….आताशा ती ही नीट ढकलली जात नव्हती म्हणा… प्रसन्ना किती मागे लागला होता ऑटोमॅटिक निषेध घेण्यासाठी पण आपणच नाही म्हटले किती वर्षाची ही जुनी सोबती आहे आता उतारवयात कुठेही ला बदलायची ह्या विचारांनी तिने नवीन विचार साठी नको म्हटले….थोडे चुकले आताशा होत नाही किती वय झाले बरे 65 पार करून दोन वर्षे झाली आता शरीर साथ देत नाही म्हणजे म्हातारे झालो की आता आपण तिने परत एकदा आरशात बघत म्हटले…

मीनाताई नुकत्याच मोठ्या टॉवर मध्ये राहायला आलेल्या…जूनी बिल्डिंग आता redevlopment साठी गेली, नवीन फ्लॅट बनायला कमीत कमी २/३ वर्ष लागणार…म्हणून मग ओळखीच्या एजंट कडून अशा सर्व सुखसोयी युक्त अशा भल्यामोठ्या टॉवरमध्ये त्या राहायला आल्या होत्या इथे जमेची बाजू एकच लिस्ट होती…त्यामुळे त्यांना संध्याकाळी बागेत वगैरे फिरायला बरे पडायचे मुद्दाम म्हाताऱ्या लोकांसाठी किंवा अपंग लोकांसाठी लागणारा राम पैकी तिथे होता जवळपास दुकान होती सगळ्या सुखसुविधा होत्या म्हणून त्यांनी जादा भाडे देऊन हे घर पसंत केले होते तसे येईल त्यांना विचारणारे फारसे कोणी नव्हते..

इमिन तीन वर्षाचा संसार झाला आपला… किती गुलाबी दिवस होते ते ..कितीतरी सपना होती उराशी….त्यात नुकतीच चाहूल लागली होती नव्या पाहुण्याच्या आगमनाची…. मग तो जीव घेणा अपघात होत्याचे नव्हते झाला अन् कायमची व्हील चेअर लागली मागे…. कंबरे खालचा भाग कायमचा अधू झाला तो झालाच…त्यात मुलं होण्याची शक्यता ही कायमची गेलीच…रडलो भेकलो…आणि शेवटी परिस्थितीला शरण गेलो कायमचे…त्याला ही आता ३० वर्षाहून अधिक झाले…३० की ३५…तिला ही प्रश्न पडला…आताशा आठवणी ही दगा देतात हल्ली….

हे होते तोपर्यंत काही वाटले नाही…घरात चैतन्य असायचे…मैफिल होत असतात…हे गेले आणि सगळेच हळू हळू बंद पडले…जणू उरला सुटला जगण्यातला रसच निघून गेला…

…. नाही म्हणायला भाचे पुंतण्या सगळे वरचेवर येऊन बघून जातात…पण आताशा त्यांना ही कुठे वेळ असणार…जाग कित्ती धावत आहे …आणि त्यात आपण असे लंगडे…अपंग… पण आता नाही…खुप झाले…शरीर साथ देत नाही…जगणं नकोच वाटायला लागले आहे…फार दिवस नाही असे चालणार…उगीच कोणावर तरी सतत अवलंबून राहून काय साध्या होणार आहे ..??? म्हणूनच आजचा हा निर्णय योग्य आहे…

Hhmm अजुन काय बर बाकी आहे…हा…ते पेपर..सगळे व्यवस्थित ठेवलेत ना..एकदा बघून येते..अशा काय आहे म्हणा आपल्याकडे…एक घर, जे मिळणार आहे अजुन २/३ वर्षानी अन् काही fd..सगळ्या जवळच्या नातवंडांच्या नावावर केलेल्या… बस इतके बाकी कुणाला काही कमी नाही म्हणा सगळेच उच्चभ्रू त्यामुळे तिच्या एका फ्लॅट आणि काही तुरळक एफडीएने कोणाला काही फरक पडणार नव्हता हे मात्र तितकेच खरे… असो आजीकडून शेवटची भेट असे म्हणत तिने देवाला नमस्कार केला यांच्या फोटोसमोर ही बराच वेळ विचार घेऊन एकटक बघत बसलो आणि शेवटी निघाली….

या टॉवरचे एक बरे असते कोण येतंय कोण जातंय कुणाचेही लक्ष नसते आता हेच बघा ना विसाव्या मजल्यावर राहते अजून दहा मजल्यावर तिथे एक टेरेस आहे… बऱ्याच उघडीच असते…हीच योग्य वेळ आहे… निर्णय आमलात आणायला
म्हणत तिने आपली व्हीलचेअर ढकलत ढकलत लिफ्ट पर्यंत आणली…आणि ३० मजला दाबला…

मनात धाकधूक होतीच…कोणी भेटणार तर नाही ना मध्येच…इतक्या रात्री ही म्हातारी एकटीच कुठे चालली म्हटल्यावर लोकांची दया बुद्धी जागी होते म्हणा…मनोमन देवाला प्रार्थना करत होती…आज नशीब बलवत्तर होते बहुतेक…कोणीच लिफ्ट मध्ये आले नाही…

ढकलत ढकलत ती टेरेस वर आली..तेव्हा गार वारा स्पर्शून गेला…खुप छान वाटले.दूरपर्यंत मुंबई लुकलुकत होती…कठड्याजवळ जाऊन ती व्हीलचेअर ढकलत ढकलत पुढे आली..बस आता थोडा जोर द्यायचा आणि कठड्याला पकडायच…आणि उडी मारायची…थोडा जोर लागेल…पण ठीक आहे प्रयत्न केला पाहिजे…कित्ती दिवस हे असे चालणार…
म्हणत तिने जोर लावायला सुरुवात केली…पण जमेना..पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला लागली..आणि तेवढ्यात तिला कोणाचा तरी आवाज ऐकू आला..कोणीतरी रडत आहे…कानोसा घेतल्यावर तिच्या लक्षात आले…ह्या वेळी कोण असेल…??

थोडीशी भीती वाटली तिला पण आपल्याच विचारांत नंतर तुला हसू आले आता काय करायचे असे म्हणून आवाजाच्या दिशेने निघाले….टेरेसच्या दुसऱ्या कोपऱ्यावर एक तरुणी बहुतेक ही वीस बावीस वर्षाची मुलगी उडी मारायच्या बेतात होती….

अगं इकडे काय करते आहे आहेस…. मीनाताई तिच्या जवळ सरकल्या… ढकलायला कुठून चोराला देव जाणे पण थोड्याच वेळात त्या तिच्या जवळ पोहोचले मागे खेचायचा प्रयत्न करु लागल्या पण आपलं दुबळे शरीर त्यांना साथ देत नव्हते….

थांब…थांब.. मुली….. हे तुझं वय नाही आहे उडी मारायचं….. असं म्हणत मीनाताईंनी जीवाच्या आकांताने तिला मागे खेचले पण खेचता खेचता त्या स्वतः खाली पडल्या… आई ग….. अशी किंकाळी त्यांनी ठोकली…

तसे ती तरुणी घाबरली…

अरे बाप रे…आजी पडल्या..म्हणून मागे सरकली…आणि तिला उठवायला हात दिला…

चला म्हणजे …ह्या मुलीने थोड्यावेळ का होईना ….विचार पुढे ढकलला…असे म्हणत मीनाताई ही थोड्या सुटकेचा निःश्वास घेतला.. पण…त्या मुलीला काही त्यांना उचलणे जमेना..

थांब हा आजी…एक मिनिट ..तुम्हाला उचलावे लागेल.बहुतेक…म्हणत मुलीने तिला दोन्ही हात दिले आणि कसेबसे उचललं आणि व्हील चेअर वर ठेवले…

हलकेच हसून तिने त्यांच्याकडे बघितले आणि एक सुस्कारा सोडला…तसे मीनाताई ने तिचा हात घट्ट धरून ठेवला…

सोडा मला आजी जाऊंद्या…असे म्हणत ती मुलगी आपला हात सोडवायला बघात होती पण मीनाताईची पकड घट्ट होती…बरीच झटापट करायचं प्रयत्न केल्यावर मुलीने नाद सोडला आणि त्यांच्याजवळ बसली तसे मीनाताई तिच्या डोक्यावरून मायने हात फिरवला…

काय झाले एवढे…?? सांगशील मला… मिनाताई ने प्रेमाने चौकशी केली तसे ती त्यांना बिलगली आणि बराच वेळ रडत राहिली…हळूहळू आपला प्रेम भंग, अभ्यासात झालेले दुर्लक्ष म्हणून मार्क कमी,त्यात काल निकाल लागला…दोन विषयात नापास झालेली…आता आई बाबा दोघा खुप बोलणार… …हे हळू हळू सांगू लागली तसे मीना ताईने डोक्यावर हात मारुन घेतला….

बस एवढेसे कारण…आता मी एक गोष्ट सांगते हा तुला…म्हणत त्यांनी आपली कर्मकाहणी सांगितली…२१ वर्षी मोठ्या घरात लग्न, सगळ्या जबाबदाऱ्या , नंतर होणारे बाळ त्याची चाहूल, डॉक्टर कडून येताना झालेला अपघात, अपंगत्व, कायमच लादलेले वांझोटेपणा, नवऱ्याची घालमेल, शरारीक मानसिक कुचंबणा, शेवटपर्यंत अपंग बायकोची साथ देणे आणि स्वतःच्या इच्छा मारुन जगणं सगळे त्यानी सांगितले आणि म्हटले आता सांगून कोणी आत्महत्या केली पाहिजे….

हळूहळू ती मुलगी सावरली.. घरात तरुण मुली त्या आई वडिलांचे दुर्लक्ष बोलायला कोणीही नाही म्हणून मग शेवटचा उपाय आत्महत्या हे तिने ठरवले होते आणि बिल्डींग मधून उडी मारायला आले होती…मीनाताई तिला बराच वेळा समजावत बसल्या..तसे ती थोडी सावरली. .

बरं आता जा बघू घरी तू…. मी सोडते तुला असे म्हणत तिचं आधार घेऊन मीनाताई व्हील चेअर ढकलत लिफ्टपाशी आल्या…आणि तिला ५ मजल दाबून दिला…नीट जा हा…मी थांबली आहे इथेच….

आजी ..पण तू काय करत होतीस इथे….जातात जाता…प्रियाने विचारले…

क्षणभर विचारात पडल्या त्या…अगं मी ना…रोज येते इथे…आमची डेट ..की काय म्हणतात ना …ती असते ना यांच्याबरोबर….ते बघ तिथे ..वाट बघत उभे आहेत केव्हांच….म्हणत दूर दिसणाऱ्या ताऱ्यकडे त्यांनी हसतच बोट केलें…

जा बघू आता… पहाट होत आली आहे…मी सांगितलेले लक्षात आहे ना…आणि हो बोलावसे वाटले ना..की ये २० मजल्यावर…लिफ्ट जवळचा फ्लॅट आहे हा…एकटीच असते मी…नाही म्हणजे उगाच तुला लाजयला नको….सगळे म्हणतात मी चहा खुप छान बनवते आणि हो वडेपण..येशील उद्या…???

प्रिया ने मान डोलावली आणि लिफ्ट येताच खाली निघून गेली…मीनाताई मात्र ५ मजला दाखवे पर्यंत थांबल्या…

गेली असेल..घरी आता… म्हणतं त्या परत टेरेस वर आल्या…माघाचा तो तारा आता अजुन समीप वाटत होता.. तसे मीनाताई बराच वेळ त्याच्याकडे बघत राहिल्या…आणि आपली व्हील चेअर घेऊन परत फिरल्या….

If you want to show me that you really love me, don’t say that you would die for me, instead stay alive for me.” – (Unknown)

Leave a comment