#15 एक छोटीसी लव स्टोरी

#14 एक छोटी सी लव स्टोरी

त्या वीकेंडला प्रीती एकटीच घरी होती…सकाळपासून प्रिय अक्षय बरोबर बाहेर जाणार होती….तिने निवांतपणे घरी  राहून आठवड्याची काम करायचे ठरवले….दुपार नंतर  उगीच राहून राहून भरून येत असल्या सारखे वाटत ..मन मंदार कडे ओढ घेत होते…उलट सुलट विचार सुरू झाले…एक मन म्हणत होते त्याने फसवले आहे….५ वर्ष रेलेशन मध्ये आहे आणि स्वतः बदलचे एवढे मोठे सत्य लपवून ठेवले…तर दुसरे मन म्हणायचे ही गोष्ट का यायच्या हातात थोडी होती ..त्याच्या आईवडिलांची चूक आहे त्यात तो भरडला गेला…विचार करून करून मेंदू थकला ..शेवटी उपाय म्हणून गूगल वर आपली समस्या पोस्ट केली…बघू तरी  लोक काय म्हणतात ते..कदाचित नवीन दिशा मिळेल विचार करायला….कोणाशी तरी खूप बोलावसे वाटत होते…पण प्रियाच नव्हती, घरी आई ला फोन केला ..जुजबी बोलून तिने फोन ठेवला…नवीन कंपनी मध्ये जास्ती कोणाशी मैत्री ही झाली नव्हती की फोन करावा वीकेंड ला…..शेवटी निनाद ला फोन केला तर तोही गायब..मग आपल्या मोबाईल वर जुने फोटो आणि आठवणी बघत रडत रडत झोपली…..

रात्री उशिरा प्रिया घरी आलेली…तर प्रीती मोबाईल घेऊन सोफ्यावर झोपलेली …. स्क्रीनवर  तिचा आणि मंदार चा फोटो होता कॉलेज मधला..किती छान दिसायचे दोघे एकत्र…काय झाले असेल ह्या दोघं मध्ये… एवढ्या दिवसात मंदार चा फोन आलेला दिसला नाही कधी..  ब्रेकअप झाला बहुतेक.हिने मनाला लावून घेतले आहे बहुतेक…तिला हलकेच उठवून आत झोपायला लावले…काळ हा सर्वातं मोठा उपाय आहे विसरेल त्याला….

प्रीती ने दुसऱ्या दिवशी ही मंदार बदल खूप विचार केला…काय करावे समजत नव्हते..प्रियाला विचारावे का.पण दुसऱ्यांच्या विचारावर आपण का आपल्या आयुष्याचे निर्णय घ्यावे…तो ही दिवस असाच टाईमपास करत विचार करत घालवला…काय करत असेल तो??? माझी आठवण येत असेल त्याला…एक मेसेज नंतर ना त्याचा फोन आला ना मेसेज केला..एवढ्यात विसरला मला…तिने फेसबुक चेक केले…काही अपडेट नाही .हम्म्म बंगलोर गेला असेल का??? कोणाकडून काही माहिती कळेल का म्हणून कॉलज चा व्हॉटसअप ग्रुप बघितले..अनेक फालतू मेसेज होते…बसा बाकी काही नाही…त्या ग्रुप मधून मंदार निघाला होता…..

नकोच फोन करायला…फसवले त्याने, उद्या घरी कळेले तर..आईला सांगू का काय झाले ते ..कधी ना कधी सांगावे  लागेलच ..ह्या गोष्टी लपून थोडी राहणार आहेत…प्रीतीने घरी फोन केला. आई घरात एकटीच होती.

काय गा काय झाले..सकाळीच तर बोललो ना आपण ..बरी आहेस ना ..??

हो आई बरी आहे..काहीच प्रॉब्लेम नाही…असाच बोलावेसे वाटले म्हणून फोन केला…आई मला बोलायचे आहे तुझ्याशी…

बोल ना.. ऐकतेय मी…

प्रीती ने आपल्या कॉलेज पासून मंदार ची भेट,आपले अनुजा आणि मंदार ला एकत्र आणायचे प्रयत्न, नंतर त्याच्यात गुंतणे, प्रेम करणे आणि शेवटीं त्याने सांगितलेले सत्य सगळे आई ला सांगितले, त्यादिवशी आपण असे का वागलो आणि त्याचा त्रास कसा झाले ते ही सांगितले….आई मी काय करू आई सांग ना….मला काहीच कळत नाही आहे..विचार करून करून दिले फुटायची वेळ आली आहे …मी आज पहिल्यांदा हतबल झाली आहे आई…मला कोणालाच दुखवायचे नाही आहे ..आई ..मला माहित आहे घरी नाही चालणार हे सगळे त्याला नाही म्हटले तर मी पुढे आनंदात राहीन की नाही माहीत नाही…मन मारून  जगेन मी…आणि हो म्हटले तर तुम्हाला कायम च दुःख देणार…मुलीने नाक म्हणतील सगळे तुम्हाला…समाज तुम्हाला आणि आम्हाला सुखाने जगू देणार नाही आई…मी काय करू आई सांग ना…असे म्हणत प्रीती ने हंबरडा फोडला…..आणि फोन शांत झाला….

आई बराच वेळ हॅलो हॅलो करत राहिली पण प्रीती चा काही प्रतिसाद आला नाही..शेवटी न राहून प्रियाला फोन केला….ती बाहेर होती पण काकुचा आवाज ऐकुन अक्षय आणि ती घरी धावले.  . .घरी प्रीती परत चक्कर येऊन पडली होती….अक्षय ने तिची नाडी चेक केली…ठोके ठीक होते …पाणी मारले…..थोड्या वेळाने ती शुद्धीवर आली……प्रचंड डोके दुखत होते आणि चक्कर येत होती…दोघं मग तिला डॉक्टरकडे घेऊन गेले……तिला स्ट्रेस असह्य झाला होता म्हणून सारखी चक्कर येत होती….

खूप उशिरा तिला घरी सोडण्यात आले…..दुसऱ्या दिवशी प्रितीचे आई बाबा दोघा ही सकाळीच आले. ती आज ऑफिस ला जाणारच नव्हती..तब्येतीचे कारण देऊन दांडी मारली तिने…..आई बाबा ना बघतच ती जरा घाबरली…माहिती अही कल आपण बोलून गेलो…आज हे दोघे काय बोलतील ते…आई जे खाणाखुणा करून सांगितले बाबा ना काही सांगितले नाही म्हणून तेव्हा कुठे प्रीतीला जरा वाटले….

दुपारनंतर बाबा बाहेर पडले होते तर प्रीती आणि आत बेडरूम मध्ये….शेवटी आईनेच विषयाला हात घातला.प्रीती कडून सगळे परत काढून घेतले आणि म्हटले प्रीती आम्हाला तुझी जास्ती काळजी…लोक काय दोन्ही बाजूने बोलतात…तू असे टेन्शन घेऊन स्वतःच्या तब्येतीवर परिणाम करून घेत आहेस. आताच काही विचार करू नकोस..

बघू पूढच पुढे…आता तो म्हणतोय शिकायला जाणार तर जाऊन दे…परत येईल तेव्हा बोला काय ते ..बाबा इतक्या सहज नाही ऐकणार प्रीती, त्यांना समजावून सांगावे लागेल ..त्या साठी धीर धर पटकन कोणीच ऐकणार नाही…त्याचे शिक्षण संस्कार घरदार नातेवाईक सगळे बघितले जाईल प्रीती मगच कदाचित बाबा होकार देतील…  ते पण फक्त तुझ्या सुखासाठी…..बाकी तुम्ही दोघांनी निर्णय घ्या..मला वाटते अजून २/३ वर्ष थांब..तो काय म्हणतोय, त्याचा स्वभाव कसा होतोय, त्याचा तुला त्रास नाही ना होत आहे हे पारख आणि मग पुढचे पाऊल टाक.तुमचे वय ते काय..अजून कुठे इतक्यात लग्नाच्या आणाभाका घेता आहेत.. आई ने तिला समजावले…….

प्रीतीने थोडे आश्चर्य चकित होत आई कडे बघितले…आई काय बोलते आहे …आपल्यासाठी सगळे स्वीकार करायला तयार आहे ही??? बाबांना पण हळूहळू समजावेल ही??आपल्यावर कित्ती प्रेम करतात दोघे…की आपल्या साठी सगळ्या जगाविरुध जायला तयार आहेत…..

आई बाबा यु आर ग्रेट !!!!!

पुढे काय होईल???प्रीती परत मंदारला फोन करेल स्वीकारेल त्याचे वास्तव…काय होईल पुढे?? नक्की वाचा पुढचा भाग….

 

Leave a comment